मलायका अरोराच्या शोचं बॉयफ्रेंडला कौतुक, तर नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स शेअर करत उडवली खिल्ली | malaika arora new show first episode telecast on ott memes goes viral on social media see details | Loksatta

मलायका अरोराच्या शोचं बॉयफ्रेंडला कौतुक, तर नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स शेअर करत उडवली खिल्ली

मलायका अरोराचा नवा शो आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. नेटकऱ्यांनी मात्र मीम्स शेअर करत तिची खिल्ली उडवली आहे.

मलायका अरोराच्या शोचं बॉयफ्रेंडला कौतुक, तर नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स शेअर करत उडवली खिल्ली
मलायका अरोराचा नवा शो आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. नेटकऱ्यांनी मात्र मीम्स शेअर करत तिची खिल्ली उडवली आहे.

मलायका अरोराचा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा शो आता ओटीटीवर प्रसारित झाला आहे. या शोचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर मलायकाचा बॉयफ्रेंज अर्जुन कपूरने तिचं तोंडभरुन कौतुक केलं. इतकंच नव्हे तर “मला तुझा अभिमान आहे” असंही अर्जुनने खास पोस्ट शेअर करत म्हटलं. पण तिचा हा शो प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर मात्र मीम्सचा पाऊस पडत आहे.

आणखी वाचा – Video : ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये अन्नाचा नाश, अर्चना गौतमने किचनमध्येच पसरवून ठेवल्या चपात्या, प्रेक्षक म्हणतात…

‘मूव्हिंग इन विथ मलायका’च्या पहिल्याच भागामध्ये मलायकाने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. अर्जुनशी लग्न करणार की नाही?, पुन्हा आई होणार का? या सगळ्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं तिने दिली. पण यावरूनच आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.

नेटकऱ्यांनी प्रसिद्धीसाठी हा शो प्रसारित करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी मलायकाच्या खासगी आयुष्याबाबत तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.

एका युजरने तर मीम शेअर करत “ही स्क्रिप्ट कोणी लिहिली आहे?” असा प्रश्न विचारला आहे.

तर दुसऱ्या युजरने या शोमध्ये जे बोललं गेलं ते सगळं खोटं असल्याचं म्हटलं आहे. शोच्या पहिल्या भागामध्ये फराह खानने हजेरी लावली होती. मलायकाने ट्रोलिंगबाबत भाष्य केल्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 11:35 IST
Next Story
Dirty Game: “काही खासगी गोष्टी जाणूनबुजून…”; ब्रिटीश राजघराण्यात पत्नीबरोबरच्या अनुभवांबद्दल प्रिन्स हॅरीचा खळबळजनक दावा