scorecardresearch

मलायका अरोरानेच केलं होतं अरबाज खानला लग्नासाठी प्रपोज, स्वत:च केला खुलासा, म्हणाली…

मलायका अरोराने अरबाज खानबरोबर लग्न करण्याबाबत केलं भाष्य

मलायका अरोरानेच केलं होतं अरबाज खानला लग्नासाठी प्रपोज, स्वत:च केला खुलासा, म्हणाली…
मलायका अरोराने अरबाझ खानशी लग्न करण्याबाबत केलं भाष्य. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या मलायका अरोराच्या शोचा पहिला भाग प्रदर्शित झाला. या शोमध्ये फराह खानने पाहुणी कलाकार म्हणून हजेरी लावली होती. मलायकाने फराहशी तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांबद्दल चर्चा केली.

मलायकाने तिचं पहिलं लग्न व पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानबाबतही या मुलाखतीत भाष्य केलं. लग्नासाठी तिनेच अरबाज खानला प्रपोज केलं असल्याचा खुलासाही मलायकाने मुलाखतीत केला. ती म्हणाली, “लग्न झालं तेव्हा मी लहान होते. मला घरातून बाहेर पडायचं होतं, म्हणून मी लग्न केलं. अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही, पण मीच अरबाजला लग्नासाठी प्रपोज केलं होतं”.

हेही वाचा>> Video: वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर शिल्पा तुळसकरचा रोमान्स; वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसली इंटिमेट सीनची झलक

हेही वाचा>> राणादा-पाठकबाईंच्या रिसेप्शन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला अन्…; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

मलायकाने अरबाजच्या स्वभावाबाबतही या शोमध्ये उघडपणे वक्तव्य केलं. मलायका म्हणाली, “अरबाज खान एक उत्तम व्यक्ती आहेत. त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे. मला आयुष्यात जे काही करायचं होतं, ते त्यांनी मला करू दिलं. माझ्या यशस्वी आयुष्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे”.

हेही वाचा>> अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी अजय देवगण उत्सुक, ट्वीट करत म्हणाला…

मलायका व अरबाज १९९८ साली विवाहबंधनात अडकले होते. परंतु, १८ वर्षांनंतर २०१७ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. सध्या मलायका बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 18:22 IST

संबंधित बातम्या