अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक चित्रपटांमधून मृण्मयीने वेगवेगळ्या धाटणीच्या भुमिका साकारल्या आहेत. आता मृण्मयीने अभिनय क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. लवकरच मृण्मयी ‘मुंबई डायरीज’ वेबसिरीजच्या दुसऱ्या भागात झळकणार आहे. मृण्मयीने एक पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा- ललित प्रभाकरचा हॉट लूक, बॅचलर ट्रिपऐवजी तीर्थयात्रा अन्…; ‘शांतीत क्रांती २’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

या वेबसिरिजचे दिग्दर्शन निखिल अडवाणी आणि निखिल गोन्जाल्विस यांनी केलं आहे. ‘मुंबई डायरीज २६/११’ चा पहिला भाग २०२१ साली प्रदर्शित झाला होता. आता लवकरच याचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २६ डिसेंबर २०११ रोजी घडलेल्या थरारक अनुभवावर आधारित आहे. आठ भागांच्या या सीरिजच्या मध्ये त्या तीन दिवसात नक्की काय घडलं असेल? हे दाखवणार आहे, मात्र डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून.

त्या भयानक आतंकवादी हल्यावर आजवर अनेक चित्रपट आणि डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्या आहेत. मात्र त्या हल्ल्याच्या दिवशी डॉक्टर कोणत्या परिस्थितीत होते याचे उत्कृष्ट रित्या वर्णन दिग्दर्शक निखिल आडवाणीने या सीरिजमध्ये केले आहे. या सीरिजमध्ये मृण्मयी देशपांडेबरोबर मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, श्रेया धन्वंतरी, सत्याजीत दुबे आणि नताशा भारद्वाज प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचा- सुपरहीट मराठी चित्रपट ‘सुभेदार’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर; वाचा कुठे पाहायला मिळणार?

मृण्मयी देशपांडेच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. चाहत्यांबरोबर अनेक कलाकारांनी मृण्मयीचे अभिनंदन केले आहेत. अमृता खानविलकर, प्रार्थना बेहरे, आदिनाथ कोठारे, सायली संजीव यांनी कमेंट करत अभिनंदन केलं आहे.

Story img Loader