Madhuri Dixit new web series: माधुरी दीक्षितने गेली अनेक वर्षे बॉलीवूड चित्रपटांतून प्रेक्षकांचा मनोरंजन केले. अभिनय आणि नृत्य यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. तिच्या अनेक भूमिकांचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते.

काही दिवसांपूर्वीच माधुरी दीक्षितने ओटीटीवर पदार्पण केले. ‘मिसेस देशपांडे’ या वेब सीरिजमधून तिने ओटीटीवर पदार्पण केले आहे. नेहमीपेक्षा एका वेगळ्या भूमिकेत अभिनेत्री दिसली. ती एका सिरियल किलरच्या भूमिकेत दिसली. तिच्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाल्याचे पाहायला मिळाला.

आता अभिनेत्री पुन्हा एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माँ बहन या वेब सीरिजमधून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे.

नव्या सीरिजमध्ये ‘धकधक गर्ल’चा ग्लॅमरस अंदाज

माधुरीच्या बोलण्याची पद्धत, तिचा लूक, मुलींबरोबरचे तिचे संभाषण, तिचे डायलॉग या ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेत आहे. ती बिहारी अॅसेंट मध्ये बोलताना दिसत आहे. तसेच ती कॉमेडी करताना देखील पाहायला मिळत आहे. तिने आतापर्यंत साकारलेल्या पात्रांपेक्षा हे पात्र वेगळे आहे. ती या वेब सीरिजमध्ये आईच्या भूमिकेत आहे. तसेच तिला दोन मुली आहेत. सगळ्यांचे स्वभाव वेगळे असल्याचे दिसते. त्याच्यांत शा‍ब्दिक चकमक देखील पाहायला मिळते.

मोठ्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री तृप्ती डिमरी आहे, तर लहान मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री धरणा दुर्गा आहे. मात्र, त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडते की ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलते. छोट्या-मोठ्या गमतीजमती देखील पाहायला मिळतात. ट्रेलरच्या शेवटी रवी किशनची यांची झलक पाहायला मिळते.

तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षितने याआधीही एकत्र काम केले आहे. भूल भुलैय्या ३मध्ये त्या एकत्र दिसल्या होत्या. आता या कलाकारांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

तसेच, नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात रवी किशन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि धरणा दुर्गा एकत्र दिसले. यावेळी ते धक धक करने लगा या गाण्यावर हे कलाकार थिरकले असल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आता ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार, नेमकी काय गोष्ट असणार, काय पाहायला मिळणार, रवी किशन यांची भूमिका काय असणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.