Neha Sargam on Mirzapur 3: बहुप्रतिक्षीत ‘मिर्झापूर’ सीरिजचा तिसरा सीझन दोन महिन्यांपूर्वी ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सीरिजचे आधीचे दोन्ही सीझन प्रचंड गाजले होते, त्यामुळे तिसऱ्या सीझनबद्दल प्रेक्षक कमालीचे उत्सुक होते. तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींना हे पर्व मनोरंजक वाटले, तर काहींना मात्र फार आवडले नाही. पण या पर्वातील एका अभिनेत्रीची खूप चर्चा झाली. या सीरिजमध्ये सलोनी भाभी हे पात्र साकारणाऱ्या नेहा सरगमने या पर्वात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
सलोनी भाभीची भूमिका साकारणाऱ्या नेहाने ‘मिर्झापूर २’ साइन करताना निर्मात्यांना एक विनंती केली होती. तेव्हा त्यांनी ही चलाखीने ही गोष्ट मान्य केली होती पण नंतर त्यांनी हा शब्द पाळला नव्हता. सीरिज रिलीज झाल्यानंतर नेहाच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. या सीरिजमध्ये तिने बरेच इंटिमेट सीन दिले आहेत. या दृश्यांबद्दल कळालं तेव्हा धक्का बसला होता, असा खुलासा नेहाने आता दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
‘मिर्झापूर’ मधील इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री रसिका दुग्गल म्हणाली, “रिहर्सलच्या वेळीच मला जाणवलं की…”
डिजिटल कॉमेंटरी पॉडकास्टच्या एका एपिसोडमध्ये नेहा सरगमने मिर्झापूरमधील तिची भूमिका आणि त्याबद्दल तिच्या पालकांची प्रतिक्रिया याबद्दल माहिती दिली. नेहाने सांगितलं की, मिर्झापूरचे असिस्टंट डायरेक्टर गुरमीत सिंग आणि सह-निर्माता पुनीत कृष्णा यांच्याबरोबर तिने भूमिकेबाबत चर्चा केली होती. सीझन ३ मध्ये तिची भूमिका आणखी चांगली असेल असं दोघांनी तिला म्हटलं होतं. त्यावर नेहाने त्यांना एक विनंती केली होती. ‘सर, एक विनंती आहे, माझ्या आई-वडिलांनी ‘बेटा, स्वच्छ काम कर’ असं सांगितलं, असं नेहा त्यांना म्हणाली होती. यावर निर्माते हसू लागले होते.
निर्मात्यांनी नेहाला दुसऱ्या सीझनसाठी साइन केलं तेव्हा निर्मात्यांनी नेहाची विनंती ऐकल्यावर यात तिचे कोणतेही इंटिमेट सीन नसल्याचं स्पष्ट केलं होतं, पण तिसऱ्या सीझनच्या सीनबद्दल सांगितल्यावर नेहाला धक्का बसला होता. “जेव्हा या मला सीनबद्दल सांगितलं तेव्हा मी जणू कोमात गेले होते. मला वाटलं की हे काय बोलत आहेत. त्यांना स्वतःला माहीत आहे का की ते काय बोलतायत.” असं नेहा म्हणाली.
नेहाने शोमध्ये बडे त्यागी म्हणजेच भरत त्यागीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. त्यागी ब्रदर्सची भूमिका विजय वर्माने केली आहे. या शोमध्ये त्याची दुहेरी भूमिका आहे.