दाक्षिणात्य चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर सातत्याने ट्रेंडिंग असतात. लोक दक्षिणेतील सस्पेन्स, थ्रिलर चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होताच या जॉनरचे चित्रपट टॉप ट्रेंडिंग सिनेमांच्या यादीत येतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याला आयएमडीबीवर खूप चांगले रेटिंग मिळाले होते. तसेच प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला आणि तो सातत्याने ओटीटीवर ट्रेंडिंग राहिला. हा सुपरहिट चित्रपट कोणता आणि तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल, याबद्दल जाणून घेऊयात.
या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात दिग्गज अभिनेते मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत. मोहनलाल त्यांच्या उत्तम अभिनयासाठी व सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांचा अलिकडेच आलेला एक एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. चित्रपटाचा सस्पेन्स दमदार आहे. कथेत तर इतके ट्विस्ट आहेत की चित्रपट पाहताना तुम्हाला कंटाळा येणार नाही. एकदा तुम्ही तो चित्रपट पाहायला सुरुवात केली की तो अर्धवट सोडून जागेवरून उठणार नाही.
चित्रपटाचे नाव व कथा
आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय, त्याचं नाव थुडारम आहे. तुम्ही तो ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. थुडारमची कथा बेंझ (मोहनलाल) नावाच्या एका माणसाभोवती फिरते, जो त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह साधं आयुष्य जगत असतो. पूर्वी तो चित्रपटांमध्ये स्टंटमन होता, परंतु जवळच्या मित्राच्या मृत्यूनंतर त्याने फिल्म इंडस्ट्री सोडली.
पाहा ट्रेलर
बेंझकडे एक कार असते. ती कार बेंझसाठी जीव की प्राण असते. एकदा बेंझचा मुलगा त्याच्या मित्रांबरोबर ही कार घेऊन बाहेर जातो. पण तिथे एक धक्कादायक घटना घडते आणि चित्रपटात मोठा ट्विस्ट येतो. त्यानंतर काही वेळातच बेंझचा मुलगा बेपत्ता होतो आणि त्याची गाडी पोलीस स्टेशनमध्ये उभी असलेली आढळते. चित्रपटात दर १० मिनिटांनी नवा ट्विस्ट पाहायला मिळतो. एकूणच थुडारममध्ये जबरदस्त सस्पेन्स आहे. हा सस्पेन्स अनुभवण्यासाठी तुम्हाला तो स्वतः OTT वर पहावा लागेल.
IMDb वर या चित्रपटाला १० पैकी ७.५ रेटिंग मिळाले आहे. जर तुम्ही चित्रपटगृहांमध्ये हा थुडारम पाहिला नसेल तर तो OTT वर नक्की पाहा. या चित्रपटाने टॉप OTT चित्रपटांच्या यादीतही स्थान मिळवले आहे.
