अलीकडे लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा घरबसल्या ओटीटीवर पाहणं जास्त पसंत करतात. जरभरातील कोणत्या देशातला, भाषेतला चित्रपट तुम्ही घरात बसून पाहू शकता. तुम्हालाही घरात कंटाळा आला असेल आणि थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायचे नसतील तर काळजी करू नका. या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर अनेक उत्तम सिनेमे पाहू शकता.

दाक्षिणात्य, बॉलीवूड आणि हॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपट आणि सीरिज या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार, प्राइम व्हिडीओ, झी ५ व जिओ सिनेमासारख्या अनेक प्लॅटफॉर्मवर तुम्हाला या कलाकृती पाहता येतील. या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट व सीरिजची यादी पाहा.

Marathi Film Festival during July 2728 in California
कॅलिफोर्नियामध्ये २७२८ जुलै दरम्यान मराठी चित्रपट महोत्सव
Loksatta viva Cannes International Film Festival for Indians important
कानच्या निमित्ताने..
Share Market Sensex and Nifty
सेन्सेक्ससाठी आजचा विक्रमी दिवस, रेकॉर्डब्रेक उसळीसह बंद होतानाही मोठी झेप; गुंतवणूकदार मालामाल!
You Like it Darker story by stephen king
चाहूल : किंग (काँग) लेखकाचा नवा कथासंग्रह…
Allu Arjun, Rashmika Mandanna starr Pushpa 2 second song Angaaron Out
Video: ‘पुष्पा २’ चित्रपटामधील श्रेया घोषालच्या आवाजातील दुसरं गाणं प्रदर्शित, अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या हूक स्टेपने वेधलं लक्ष
Manthan will re release in theaters
Cannes मधील स्क्रीनिंगनंतर ‘मंथन’ ४८ वर्षांनी पुन्हा थिएटर्समध्ये पाहता येणार; कधी, कुठे होणार प्रदर्शित? जाणून घ्या
Laapataa Ladies beats Animal on netflix
‘लापता लेडीज’ने ब्लॉकबस्टर ‘ॲनिमल’ला टाकलं मागे; OTT वर केली मोठी कामगिरी, किरण रावची पोस्ट व्हायरल
crew on OTT
करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी OTT वर पाहता येणार; या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती कोणत्या? वाचा नावं

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

क्रॅक

जर तुम्हा अॅक्शन चित्रपट पाहायला आवडत असतील, तर तुम्ही अर्जुन रामपाल व विद्युत जामवाल यांचा अॅक्शन थ्रिलर ‘क्रॅक’ पाहू शकता. हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर आज (२६ एप्रिलला) रिलीज होतोय. या चित्रपटात नोरा फतेहीदेखील आहे. आपल्या हरवलेल्या भावाला शोधणाऱ्या हिरोची ही गोष्ट आहे.

वश

अजय देवगनचा चित्रपट ‘शैतान’ गुजराती फिल्म ‘वश’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात प्रताप नावाची एक अनोळखी माणूस एका कुटुंबाला भेटतो, सुरुवातीला तो यांची मदत करतो पण नंतर त्यांच्यासाठी अडचणीचा ठरतो. हा चित्रपट शेमारूवर आजपासून पाहता येईल.

टिल्लू स्क्वेअर

या चित्रपटात सिद्धू जोनलगड्डा व अनुपमा परमेश्वरन मुख्य भूमिकेत आहेत. याचं दिग्दर्शन मलिक रामने केलं आहे, हा चित्रपटही तुम्ही आजपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

चित्रपटात चमकीला यांच्या जातीचा वारंवार उल्लेख, इम्तियाज अली म्हणाले, “त्यामुळेच त्यांनी आपला जीव गमावला, कारण…”

भीमा

या यादीत ‘भीमा’ नावाच्या दाक्षिणात्य चित्रपटाचा समावेश आहे. एका मंदिरातील रहस्यमयी घटनांबाबत शोध घेणाऱ्या गुप्तहेराची ही गोष्टी आहे. हा चित्रपट आज २६ एप्रिलपासून तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

लापता लेडीज

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आज प्रदर्शित होणार आहे.

कुंग फू पांडा ४

‘कुंग फू पांडा ४’ हा चित्रपट आज २६ एप्रिलपासून बूक माय शोवर पाहू शकता.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

सिटी हंटर

चित्रपट एक उत्तम निशानेबाज आणि प्लेबॉय, रयो साएबाच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.