ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोक घरबसल्या भारतातीलच नव्हे तर जगभरातील चित्रपट पाहू शकतात. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला चित्रपट, वेब सीरिज, टीव्ही शो व डॉक्युमेंटरीसह अनेक कलाकृती पाहायला मिळतात. आता जुलै महिना संपत आला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर काय नवीन पाहायला मिळेल याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. याच कलाकृतींची यादी जाणून घेऊयात. चंदू चॅम्पियन कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाने थिएटरमध्ये चांगली कमाई केली होती. आता निर्माते तो ओटीटीवर प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर ९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. “त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव फिर आई हसीन दिलरुबा विक्रांत मॅसी व तापसी पन्नू यांचा ‘फिर आयी हसनी दिलरुबा’ हा २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. तो ९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक व चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मनोरथंगल कमल हासन, मामूट्टी, मोहनलाल आणि फहाद फासिल यांची 'मनोरथंगल' ही वेब सीरिज १५ ऑगस्ट रोजी ZEE5 वर प्रसारित होईल. यात ९ वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. याचे दिग्दर्शन आठ जणांनी केले आहे. यशस्वी मॉडेल, सुपरस्टार्ससह केलं काम, पण २५ चित्रपट झाले फ्लॉप; ‘या’ अभिनेत्याने फक्त अभिनय नव्हे तर देशही सोडला ग्यारह ग्यारह टीव्ही होस्ट, डान्सर आणि अभिनेता राघव जुयाल 'किल'च्या निर्मात्यांसह 'ग्यारह गयाह' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात अभिनेत्री कृतिका कामरा व धैर्य करवा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही सीरिज ९ ऑगस्ट रोजी ZEE5 वर प्रसारित होईल. ग्यारह ग्यारह वेब सीरिज “चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा…”, पूर्वाश्रमीच्या पतीने साखरपुडा केल्यावर मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत घुड़चढ़ी संजय दत्त व रवीना टंडन यांचा चित्रपट 'घुड़चढ़ी' ९ ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक- कॉमेडी चित्रपट आहे. खुशाली कुमार, पार्थ समथान आणि अरुणा इराणी यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. लाइफ हिल गई दिव्येंदू शर्मा आणि कुशा कपिला स्टारर वेब सीरिज 'लाइफ हिल गई' देखील ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सीरिजही ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. यात विनय पाठक आणि भाग्यश्री यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. “मी खूप घाबरले होते, पण तो…”, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितलेला सनी देओलबरोबर किसिंग सीनचा अनुभव किल राघव जुयाल, लक्ष्य व तान्या मानिकतला यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘किल’ चित्रपट डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. याचे दिग्दर्शन निखिल नागेश भट्ट यांनी केलं आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २१.१५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे खूप कौतुकही झाले.