Mr and Mrs Mahi OTT Release: तुम्ही ओटीटीवर काहीतरी नवीन बघायचा विचार करत असाल व बॉलीवूड सिनेमाचे ऑप्शन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. तुम्हाला जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) व राजकुमार राव यांचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा अनोखी लव्ह स्टोरी असलेला सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. जान्हवी कपूर व राजकुमार राव (Rajkummar Rao) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट ३१ मे रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. ज्यांनी सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट पाहिला नाही, त्यांना ओटीटीवर हा चित्रपट पाहता येईल. रेखा यांनी धावत जाऊन जया बच्चन यांना मारली होती मिठी, दोघींनी एकत्र उभे राहून अमिताभ बच्चन यांना… सिनेमाचे बजेट होते ४० कोटी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा २०२४ मधील बहुप्रतिक्षित चित्रपट होता. क्रिकेट आणि रोमान्सचा मिलाफ असलेल्या या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळाली. फक्त ४० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ने ५० कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ ओटीटी रिलीज (फोटो - इन्स्टाग्राम) सोनाक्षी सिन्हाची पती झहीरसह फिलिपिन्स सफर, हनिमूनचे रोमँटिक Photos केले शेअर कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार सिनेमा? 'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाचे ओटीटी हक्क नेटफ्लिक्सला विकले आहेत, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार त्याबाबतही माहिती समोर आली आहे. नेटफ्लिक्सवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार हा चित्रपट २५ जुलैच्या रात्री म्हणजेच २६ जुलैपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या… या चित्रपटात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर पती-पत्नी असून त्यांची अनोखी प्रेमकथा दाखवण्यात येणार आहे. या दोन स्टार्सबरोबरच झरीना वहाब, हिमांशू जयकर, राजेश शर्मा आणि कुमुद मिश्रा यांसारख्या कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. शरण शर्मा दिग्दर्शित 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे.