Mrithyunjay Action Thriller on Netflix: ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. यातच भर पडली आहे ती म्हणजे ‘मृत्युंजय’ (Mrithyunjay) या २०२६ मधील जबरदस्त ॲक्शन थ्रिलर चित्रपटाची. दाक्षिणात्य अभिनेता श्री विष्णूची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ६ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, मात्र आता ३ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर येताच याने धुमाकूळ घातला आहे. नेटफ्लिक्सच्या ‘टॉप १०’ यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला हा चित्रपट एका क्राईम इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टच्या साहसी प्रवासावर आधारित आहे. अच्युत शर्मा यांची हत्या की अपघात? आणि ‘साधू’ नावाच्या हुशार कॉन्ट्रॅक्ट किलरचे गुपित काय? याभोवती फिरणारे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे.

नेटफ्लिक्सवर ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचा जलवा

आज आम्ही ज्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, त्याचं नाव आहे ‘मृत्युंजय’ (Mrithyunjay). श्री विष्णू याची मुख्य भूमिका असलेला हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप १० लिस्टमध्ये ट्रेंड करत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी केली नसली, तरी ओटीटीवर मात्र हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे.

चित्रपटाची मृत्युंजय कथा काय आहे?

मृत्युंजय या ॲक्शन थ्रिलरची कथा जय नावाच्या एका पत्रकाराभोवती फिरते. जय सध्या शोकसंदेश किंवा श्रद्धांजलीच्या जाहिराती गोळा करण्याचे काम करत असतो, पण त्याचं स्वप्न एक गुन्हे शोध पत्रकार (Crime Investigative Journalist) व्हायचं आहे. एके दिवशी त्याच्यासमोर अच्युत शर्मा नावाच्या व्यक्तीच्या मृत्यूचं प्रकरण येतं. अंजलीबद्दल सहानुभूती वाटल्यामुळे, जय तिचे वडील अच्युत शर्मा यांच्या हत्येचं रहस्य उलगडण्याचं वचन तिला देतो.

Award Banner

दुसरीकडे, एसीपी सीता शहरात होत असलेल्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याचे काम करत असते, पण पोलीस कमिशनर हे प्रकरण अपघात असल्याचे सांगून बंद करण्यासाठी तिच्यावर दबाव आणतात. जय आणि सीता कशा प्रकारे एकत्र येऊन ही प्रकरणं सोडवतात आणि ‘साधू’ नावाच्या एका कुख्यात पण अत्यंत हुशार कॉन्ट्रॅक्ट किलरला कसं पकडतात हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग आहे मृत्यूंजय

‘मृत्युंजय’ (Mrithyunjay) हा २०२६ मधील एक तेलुगू ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्री हुसैन शा किरण यांनी केले असून श्री विष्णू आणि रेबा मोनिका जॉन यांनी यात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट ६ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि आता ३ एप्रिलपासून तो नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाला आहे. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या ‘टॉप १०’ यादीत दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

दमदार कथा, कथेतील अनपेक्षित ट्विस्ट आणि कलकारांचा उत्तम अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. तुम्हाला अॅक्शन थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील तर मृत्यूंजय तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही तो नेटफ्लिक्सवर पाहू शकता.