Mrunal Thakur Dacoit OTT Release Date: मृणाल ठाकूरने गेल्या काही वर्षांत सिनेसृष्टीत तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास टेलिव्हिजनपासून सुरू झाला होता. कुमकुम भाग्य या मालिकेतील तिची भूमिकेने लक्ष वेधले होते. या मालिकेत तिने बुलबुल ही भूमिका साकारली होती.
ओ सोनिया चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. २०१८ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या सीता रामम या सिनेमातून मृणाल ठाकूरला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. देशभरातून तिच्या भूमिकेवर कौतुकाचा वर्षाव केला. सिनेसृष्टीत तिची वेगळी ओळख निर्माण केली. हाय पापा, सुपर ३०, जर्सी, गुमराह, लस्ट स्टोरीज २ अशा अनेक चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.तिने विट्टी दांडू आणि सुराज्य या मराठी सिनेमांमध्येदेखील काम केले आहे.
नुकतीच मृणाल ठाकूर डकैत या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हा सिनेमा १० एप्रिल २०२६ ला प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तिच्या इतर चित्रपटांसारखा गाजला नाही. तिच्याबरोबर यामध्ये आदिवी शेष हा अभिनेता प्रमुख भूमिकेत दिसला होता. आता हा सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
डेक्कन क्रोनिकलनुसार, मृणाल ठाकूरची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा ८ मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच, तो तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
आता हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र, त्याबद्दल अजूनही कोणतीही माहिती समोर आली नाही. सुरुवातीला असे म्हटले जात होते की प्राईम व्हिडीओकडे चित्रपटाचे डिजिटल हक्क आहेत. आता याबद्दल निर्माते कधी घोषणा करणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मृणाल ठाकूर व आदिवी शेष यांच्याबरोबरच, प्रकाश राज, अनुराग कश्यप हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईबाबत बोलायचे तर २० दिवसात या सिनेमाने भारतात ४२. २३ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात सिनेमाने ५४ कोटींची कमाई केली आहे. आता ओटीटीवर सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
