Munawar Faruqui : बिग बॉस विजेता आणि स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला ( Munawar Faruqui ) ठार माऱण्याची धमकी देण्यात आली. दिल्लीत एका कार्यक्रमासाठी मुनव्वर फारुकी गेला होता मात्र जिवे मारण्याची धमकी आल्याने तो तातडीने मुंबईला परतला. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती आता समोर आली आहे. दिल्लीतल्या इनडोअर स्टेडियम आणि सूर्या हॉटेल या ठिकाणी ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

मुनव्वर फारुकी ( Munawar Faruqui ) आणि युट्यूबर एल्विश हे दोघंही दिल्लीतल्या सूर्या हॉटेलमध्ये होते. दोघंही आजीआय स्टेडियमवर मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठीही गेले होते. त्यावेळीच ही धमकी देण्यात आली. हल्लेखोरांनी हॉटेलची रेकी केल्याचंही समजलं होतं. ज्यानंतर हा सामना थांबवण्यात आला. पोलिसांनी स्टेडियमची पूर्ण पाहणी केली. स्टेडियमची पाहणी केल्यानंतर सामना सुरु करण्यात आला. सामना संपल्यानंतर मुनव्वर फारुकीला मुंबईला पाठवण्यात आलं. यानंतर मुनव्वर फारुकी ( Munawar Faruqui ) दिल्लीत आला तर त्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

farmer beaten up due to dog
कुत्र्याला बाहेर सोडू नका सांगणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; थेट पोलीस अधिक्षकांकडे तक्रार
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
female police attacked in police station with sharp blade in ulhasnagar
उल्हासनगरमध्ये महिला पोलिसाला पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
father rape daughter marathi news
नाशिक: पित्याकडून मुलीवर अत्याचार
three suspects in police custody for attempt to killing three students by throwing them in a well
नाशिक : विहिरीत तीन विद्यार्थ्यांना फेकून मारण्याचा प्रयत्न – संशयित ताब्यात
on Monday man killed on the roof of a building in Kolshet
ठाण्यात शीर धडवेगळे करून एकाची हत्या
Gym Owner Killed in Delhi
Gym Owner Murder : दिल्लीतल्या जिम मालकाची गोळ्या झाडून हत्या, लॉरेन्स बिश्नोई गँगचं ‘हे’ कनेक्शन समोर
Ragpicker injured
Ragpicker Injured in Blast : ढिगाऱ्यातून कचरा वेचताना अचानक झाला स्फोट, वेचकाची बोटे तुटली; कोलकात्यात नेमकं काय घडलं?

क्रिकेट लीगसाठी दिल्लीत आला होता मुनव्वर फारुकी

काही दिवसांपूर्वी ईसीएल क्रिकेट लीग सुरु झाली आहे. मुनव्वर फारुकी, एल्विश यादव, अभिषक मल्हान, सोनी शर्मा आणि अनुराग द्विवेदी खेळत आहेत. यासाठीच हे लोक इथे आले होते. २२ सप्टेंबरपर्यंत ही लीग चालणार आहे. दिल्ली पोलीस एका गोळीबार प्रकरणाची चौकशी करत होते. त्यावेळी काही संशयितांकडून पोलीस माहिती घेत होते. त्यावेळी काही संशयितांकडून त्यांना ही माहिती मिळाली की सूर्या हॉटेलची रेकी करायला ते गेले होते. मुनव्वर फारुकीवर ( Munawar Faruqui ) हल्ला होणार ही माहिती याच संशयितांच्या चौकशीतून पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने सूर्या हॉटेल या ठिकाणी धाव घेतली आणि काही संशयास्पद आढळतं आहे का याची माहिती घेतली, तपास केला.

मुनव्वर फारुकी दिल्लीतल्या सूर्या हॉटेलमध्ये थांबला होता

मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) सूर्या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर थांबला होता. या खोलीचीही झडती पोलिसांनी घेतली. आम्हाला जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा आम्ही सुरक्षा वाढवली. तसंच मैदानात सगळं काही व्यवस्थित आहे ना? हे पाहूनच सामना पुढे सुरु करण्यास संमती दिली. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात सामना पार पडला अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- Munawar Faruqui : मुनव्वर फारुखीने कोकणी माणसावरील असंवेदनशील वक्तव्याबद्दल मागितली माफी, राजकीय पक्षांनी धरले होते धारेवर

मुनव्वर फारुकी चित्रपटातही दिसणार?

मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, मुनव्वर नुकताच उर्फी जावेदचा शो ‘फॉलो कर लो’ च्या एका एपिसोडमध्ये दिसला होता. लवकरच मुनव्वर फारुकी सिनेमांतही काम करणार असल्याची चर्चा आहे. मुनव्वर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी कोकणी लोकांबाबत क्राऊड वर्क करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याने तो चर्चेत आला होता. मात्र ते आपल्याकडून अनावधानाने झालं, मला कुणालाही दुखवायचं नव्हतं असं फारुकीने सांगितलं आणि माफी मागितली होती. कोकणी माणसावरच्या टीकेमुळे आणि नंतर मागितलेल्या माफीमुळे त्याची चर्चा झाली होती.