हेमंत अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदुक बिरयानी’ हा मराठी चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. वेगळ्या विषयाची हटके मांडणी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला. या चित्रपटातील गाणी आणि टीझरपासूनच प्रेक्षकांना याची उत्सुकता लागून राहिली होती. सगळ्याच स्तरातून या चित्रपटाचं कौतुक झालं.
बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरी प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला. खासकरून नागराज मंजुळे यांना एका धासु पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रथमच पाहिल्याने त्यांची ही भूमिका लोकांना आवडली. खास नागराज मंजुळे टच या चित्रपटात जाणवत असल्याने लोकांना तो आवडला.




आणखी वाचा : ठरलं! ‘या’ दिवशी होणार ‘असुर’चा सीझन २ प्रदर्शित; अगदी मोफत पाहायला मिळणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर
आता बॉक्स ऑफिसवर धमाल केल्यानंतर हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेता आकाश ठोसर याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून याबद्दल माहिती दिली आहे. अॅक्शन, कॉमेडी आणि एक गंभीर विषयाची वेगळी हाताळणी असलेला ‘घर बंदुक बिरयानी’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर २ जूनला ‘झी ५’ या ओटीटीवर होणार आहे.
२ जूनपासून ‘घर बंदुक बिरयानी’ हा झी ५ या ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात आकाश ठोसर, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, सायली पाटील हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.