Nana Patekar Movies : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मराठीसह बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनी नाना पाटेकरांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ सिनेमातून नाना पाटेकर यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपटसृष्टीत एन्ट्री घेतल्यावर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांचे एका पाठोपाठ एक सगळेच सिनेमे सुपरहिट ठरले. ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘तिरंगा’ यांसारख्या चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. हे सिनेमे प्रेक्षकांना आता कुठे पाहता येतील जाणून घेऊयात…

क्रांतिवीर

क्रांतिवीर चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात नानांनी ‘प्रताप नारायण तिलक’ ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रताप नावाच्या एका तरुणाभोवती फिरतो, जो समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि राजकीय नेत्यांविरुद्ध आवाज उठवतो. या चित्रपटातील नानांचा “ये मुसलमान का खून, ये हिंदू का खून… बता इसमें मुसलमान का कौन सा, हिंदू का कौन सा…” हा डायलॉग सर्वत्र तुफान गाजला होता. आता ‘क्रांतिवीर’ सिनेमा प्रेक्षकांना अमेझॉन प्राइमवर पाहता येईल. या चित्रपटाचा रनटाइम २ तास २७ मिनिट आहे.

डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी गडचिरोली (हेमलकसा) येथील गोंड आदिवासींच्या कल्याणासाठी व आरोग्यासाठी केलेल्या कार्यावर हा बायोपिक आधारित आहे. यामध्ये सोनाली कुलकर्णी आणि नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. अमेझॉन प्राइम आणि Zee 5 वर हा बायोपिक पाहता येईल.

परिंदा

‘परिंदा’ (Parinda) हा चित्रपट १९८९ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये नानांनी अण्णांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षक नेटफ्लिक्स तसेच अमेझॉन प्राइमवर पाहू शकतात.

अग्निसाक्षी

१९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या अग्निसाक्षी सिनेमा नाना पाटेकरांनी विश्वनाथ ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना अमेझॉन प्राइम आणि जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.

नटसम्राट

१ जानेवारी २०१६ रोजी ‘नटसम्राट’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने मराठी कलाविश्वाला सुद्धा एक नवीन दिशा मिळाली. नटसम्राटला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं. नानांच्या अभिनयाचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं. हा ब्लॉकबस्टर सिनेमा प्रेक्षक अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स तसेच Zee 5 वर सुद्धा पाहू शकतात.

तिरंगा

१९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ सिनेमात सुद्धा अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी होती. यामध्ये नानांनी पोलिस इन्स्पेक्टर शिवाजीराव वाघलेंची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षक Zee5, अमेझॉन प्राइम आणि जिओहॉटस्टारवर पाहू शकतात.

प्रहार

१९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रहार’ सिनेमातही नाना महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. विशेष म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा त्यांनी स्वत: केलं होतं. हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.

पक पक पकाक

‘पक पक पकाक’ या २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने मराठी सिनेमाला एक नवीन दिशा दिली. नाना पाटेकरांनी साकारलेला ‘भूत्या’ घराघरांत पोहोचला. विशेष म्हणजे यातील गाणीही सर्वत्र लोकप्रिय आहेत. हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.