OTT Release: जर थिएटरमध्ये एखादा सिनेमा बघितला नसेल तर तो सिनेमा आपल्याला ओटीटीवर पाहता येतो. ओटीटीवरदेखील सिनेमांना प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळते. काही सिनेमे ट्रेंड होतात.
ओटीटीवर दर आठवड्याला नवीन शो, विविध वेब सीरिज, मायक्रो सीरिज, चित्रपट प्रदर्शित होत असतात. आता या आठवड्यात नवीन ३ हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. आता हे कोणते सिनेमे आहेत आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत, हे जाणून घेऊ…
१. ओ रोमिओ
१० एप्रिलला शाहिद कपूर व तृप्ती डिमरी यांचा ओ रोमिओ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, सिनेमाला प्रेक्षकांचा तितका प्रतिसाद मिळाल नाही. मात्र, सिनेमातील काही गाणी लोकप्रिय ठरली.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७१. ९४ कोटींची कमाई केली. या सिनेमात नाना पाटेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. विशाल भारद्वाज यांनी हा सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. आता हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहेत. ओ रोमिओ हा सिनेमा १० एप्रिलला प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
२. तू या मैं
बिजॉय नांबियार दिग्दर्शित तू या मैं हा सिनेमादेखील ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कौतुक तर झाले पण, सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.
या सिनेमात आदर्श गौरव व शनाया कपूर हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात दोन Gen-Z इन्फ्ल्युएन्सरची गोष्ट पाहायला मिळते. तू या मैं हा सिनेमा १० एप्रिल २०२६ ला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
३. अस्सी
अनुभव सिन्हा दिग्दर्शित अस्सी या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. हा एक महत्वाचा चित्रपट असल्याचे मत समीक्षकांनी मांडले आहे. असे असले तरी बॉक्स ऑफिसवर मात्र सिनेमाला यश मिळू शकले नाही. तापसी पन्नू या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.
१७ एप्रिल २०२६ ला हा सिनेमा झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.दरम्यान, चित्रपटगृहांतदेखील आगामी काळात अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये भूत बंगला, डकैत या सिनेमांचा समावेश आहे.
