Vadh 2 OTT Release : ओटीटीवर नेहमीच नव नवीन कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. विविध भाषेतील वेगवेगळे विषय असलेल्या सीरिज व चित्रपट यामार्फत प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळतात, त्यामुळे प्रेक्षक वीकेंडला काय नवीन पाहता येईल या शोधात असतात. अशातच आता ओटीटीवर लवकरच एक लोकप्रिय हिंदी चित्रपटाचा सीक्वल प्रदर्शित होत आहे.
बॉलीवूडमधील अनेक कलाकार मंडळी सध्या ओटीटी गाजवताना दिसत आहेत. यामध्ये अनेक मोठ्या कलाकारांचंही नाव आहे. अशातच आता इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या लोकप्रिय चित्रपटाचा सीक्वल लवकरच ओटीटीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ओटीटीवर कधी रिलीज होणार ‘वध २’?
सध्या ओटीटीवर एकापेक्षा एक अशा कलाकृती पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, तर काही येत्या काळात रिलीज होत आहेत. यापैकीच एक म्हणजे नीना गुप्ता व संजय मिश्रा यांचा आगामी लोकप्रिय क्राईम थ्रिलर चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. जसपाल सिंह संधू लिखित व दिग्दर्शित ‘वध २’ हा ‘वध’ या २०२२ मध्ये आलेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे ज्याचं दिग्दर्शनसुद्धा जसपाल यांनीच केलं होतं. ‘वध २’ २३ नोव्हेंबर २०२५ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झालेला.
कुठे पाहायचा?
थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ‘वध २’चं चित्रपट समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून कौतुक झालं होतं. अशातच आता ३ एप्रिलला नेटफ्लिक्सवर नीना गुप्ता यांचा ‘वध २’ रिलीज होत आहे. ‘वध २’ हा २०२६ मधील एक थ्रिलर चित्रपट आहे, ज्याची कथा तुरुंगातील गुन्ह्यांभोवती फिरते. चित्रपटात संजय मिश्रा यांनी एका थकलेल्या कारागृह रक्षकाची भूमिका साकारली आहे आणि नीना गुप्ता यांनी अनेक वर्षांपासून तुरुंगात असलेल्या कैद्याची भूमिका साकारली आहे. ते दोघेही तुरुंगातील कठीण परिस्थितीला सामोरे जात असतात. परंतु, पुढे तुरुंगात एक घटना घडते, ज्यानंतर कथेत मोठं वळण येतं. हा चित्रपट एक क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. आता ओटीटीवर रिलीज होत असल्यानं ज्यांना थिएटरमध्ये जाऊन पाहता आला नाही ते लोक घरबसल्या हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.
‘वध २’ या चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर नीना गुप्ता आणि संजय मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत, तर संजय मिश्रा एका कारागृह रक्षकाच्या भूमिकेत असून त्यांच्या पात्राचं नाव शंभूनाथ मिश्रा असं आहे. नीना गुप्ता यांच्या पात्राचं नाव मंजू मिश्रा असं आहे. या व्यतिरिक्त शिल्पा शुक्ला यांनी रजनी, अक्षय डोगरानं केशव, योगिता बिहानीनं नैना कुमारी अशा भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची कथा जसपाल सिंह संधू, नेहा शितोळे आणि राहुल सैन यांनी लिहिली आहे; तर याची निर्मिती लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.
