Trending Crime Thriller Series : जर तुम्हाला क्राइम ड्रामा आवडत असेल, तर ओटीटीवर एक नवी वेब सीरिज रिलीज झाली आहे. सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेल्या या सीरिजचा रिलीज होताच ओटीटीच्या टॉप ट्रेंडिंग यादीत समावेश झाला आहे.
ओटीटीवरील ही सीरिज ८ भागांची असून आठवडाभरापूर्वीच ही सीरिज प्रदर्शित झाली आणि आता मोठ्या सीरिजनाही मागे टाकत ती टॉप १० ट्रेंडिंगमध्ये पोहोचली आहे. आम्ही ज्या सीरिजबद्दल बोलत आहोत, ती म्हणजे Nemesis. ही एक सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलर सीरिज आहे.
काय आहे सीरिजची कथा?
या सीरिजची कथा लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या एका पोलिस अधिकारी आणि एका चालाख चोराभोवती फिरते. दोघांमध्ये सुरू झालेला संघर्ष आणि थरार या सीरिजमध्ये पाहायला मिळतो. दोघांमधील ही लढाई त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही मोठा परिणाम करते. Nemesis या सीरिजमध्ये Matthew Law, Y’lan Noel, Gail Bean, Sophina Brown आणि Ariana Guerra यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ही क्राइम थ्रिलर सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
Nemesis ही सीरिज १४ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाली होती. या सीरिजला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरी प्रेक्षक मात्र तिला भरभरून पसंती देत आहेत. त्यामुळेच ही सीरिज सध्या ओटीटीवर ट्रेंड होत आहे.
Courtney A. Kemp यांच्या या क्राइम सीरिजमध्ये एकूण ८ भाग आहेत आणि प्रत्येक भाग साधारण एका तासाचा आहे. Nemesis मध्ये इमोशनसोबतच भरपूर अॅक्शनही पाहायला मिळतं. जर तुम्ही नवी क्राइम सीरिज पाहण्याचा विचार करत असाल, तर ही सीरिज तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच ठेवू शकता. या सीरिजने My Royal Nemesis आणि Maamla Legal Hai च्या दुसऱ्या सीझनलाही मागे टाकलं आहे.
ओटीटीवर सध्या अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित आणि विविध भाषेतील सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. लव्हस्टोरी, क्राइम, थ्रिलर, कॉमेडी, हॉरर अशा विविध जनरच्या सीरिज आणि चित्रपट पाहायला मिळत आहेत. पण, थ्रिलर, क्राइम आणि हॉरर या जॉनरच्या सीरिजची क्रेझ वेगळीच असते. त्यामुळेच या धाटणीच्या कलाकृतींची आवड असणाऱ्या लोकांसाठी Nemesis एक चांगला पर्याय ठरू शकतो.
