Netflix If Wishes Could Kill: जर तुमच्याकडे असं एखादं ॲप आलं जे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतं, तर तुम्ही ते वापराल का? पण सावधान! तुमची ही एक छोटीशी चूक जीवावर बेतू शकते. नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘इफ विशेस कुड किल’ (If Wishes Could Kill) ही कोरियन हॉरर ड्रामा सिरीज सध्या जगभरात आणि महाराष्ट्रातही प्रचंड ट्रेंड करत आहे. सस्पेन्स, थ्रिलर आणि अंगावर काटा आणणाऱ्या भीतीचा हा मिलाफ प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. ८ एपिसोड्सची ही सिरीज ‘कोरियन शामॅनिझम’ म्हणजेच एका भयंकर जादूटोण्यावर आधारित असून ती सध्या नंबर १ वर आहे.
जर तुमच्याकडे असे एखादे ॲप असेल जे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते, तर तुम्ही ते अॅप वापराल का? जर तुमचं उत्तर ‘हो’ असेल, तर तुम्ही ही सीरिज एकदा बघायलाच हवी. ही सीरिज पाहिल्यानंतर तुम्ही अशी चूक कधीच करणार नाही. ही एक जबरदस्त कोरियन हॉरर सिरीज आहे. एकदा का तुम्ही ही पाहायला सुरुवात केली की, पूर्ण संपवल्याशिवाय राहू शकणार नाही.
या सीरिजमध्ये एकूण ८ एपिसोड्स आहेत. ही कथा हायस्कूलमध्ये जाणाऱ्या काही मुलांची आहे, जे एका मोठ्या संकटात अडकतात. जर तुम्हाला ‘ब्लॅक मॅजिक’ किंवा अंगावर काटा आणणाऱ्या थरारक हॉरर सीरिज आवडत असतील, तर ही सीरिज तुमच्यासाठीच आहे. सध्या ही सीरिज जगभरात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
हॉरर सीरिजची कथा काय आहे?
ही पाच मित्रांची गोष्ट आहे. या पाच मित्रांपैकी एकाच्या हाती एक असे ॲप लागते, जे लोकांच्या इच्छा तर पूर्ण करते, पण त्या बदल्यात इच्छा मागणाऱ्याचा जीव घेते. ज्या मित्राला या ॲपबद्दल समजते, तो आपल्या इतर मित्रांनाही त्याबद्दल सांगतो. अशा प्रकारे बाकीचे चार मित्रही या ॲपच्या जाळ्यात अडकतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात ज्या घटना घडतात, त्या अतिशय भयंकर असतात. या सीरीजमध्ये तुम्हाला ‘कोरियन शामॅनिझम’ म्हणजेच एका प्रकारचा जादूटोणा, ब्लॅक मॅजिक पाहायला मिळेल.
सस्पेन्स, थ्रिलर आणि हॉररचा मिलाफ
सीरिज जसजशी पुढे सरकते, तसं हे ॲप लोकांचा जीव का घेते, याचं गुपित उलगडत जाते. दोन मित्रांची मैत्री तुटते व ते एकमेकांचे शत्रू होतात, त्यातून या ॲपचा जन्म होतो. सीरीजमध्ये असे काही प्रसंग आहेत जे तुम्हाला हादरवून सोडतील. यात सस्पेन्स, भीती आणि जगण्यासाठीचा संघर्ष पाहायला मिळतो. ही सीरिज तुम्ही अजिबात चुकवू नका.
‘इफ विशेस कुड किल’मधील कलाकार आणि रेटिंग
या सीरिजमध्ये जिऑन सो-यंग, कांग मि-ना, बेक सन-हो, ह्यून वू-सियोक, ली ह्यो-जे, जिऑन सो-नी आणि किम सी-आह यांसारख्या कलाकारांनी काम केलं आहे. या सीरिजला आयएमडीबीवर ७.२ रेटिंग मिळाले आहे. ही सीरिज प्रेक्षकांनाही भावली आहे. ही नेटफ्लिक्सवरील सर्वोत्तम सीरिज आहे, माणूस जेव्हा कोणत्याही मोहात अडकतो तेव्हा काय होतं, हे या सीरिजमध्ये भयंकर पद्धतीने दाखवलंय, सीरिजमध्ये थरार व भीती आहे, ती नक्कीच पाहायला हवी, अशी कमेंट्स युजर्सनी आयएमडीबीवर केल्या आहेत.
