Netflix Top 10 Trending Movies : डिजिटल प्लॅटफॉर्मवर सध्या दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नेटफ्लिक्स इंडियाने नुकतीच या आठवड्यातील टॉप १० चित्रपटांची यादी जाहीर केली असून यामध्ये राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाने बाजी मारली आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सलग दोन आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ हा चित्रपट १० आठवड्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून त्याला ८.३ रेटिंग मिळाले आहे. या व्यतिरिक्त ‘बॉर्डर २’ आणि ‘वध २’ सारखे चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

१. मर्दानी ३

या यादीत राणी मुखर्जीचा ‘मर्दानी ३’ चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. अभिराज मीनावाला यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हा चित्रपट टॉप १० मध्ये असून याचे आयएमडीबी रेटिंग ६.६ आहे.

२. धुरंधर

दुसऱ्या क्रमांकावर रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ चित्रपट आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी ५ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट सलग १० आठवड्यांपासून नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे. याचे रेटिंग ८.३ आहे.

३. वध २

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा ‘वध २’ चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन जसपाल सिंह संधू यांनी केले आहे. एका आठवड्यापासून हा चित्रपट टॉप १० मध्ये असून याचे रेटिंग ७.४ आहे.

४. मृत्युंजय

चौथ्या क्रमांकावर ‘मृत्युंजय’ हा तेलगू ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हुसेन शाह किरण यांनी याचे दिग्दर्शन केले असून ६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याचे रेटिंग ६.५ आहे.

netflix top 10 trending movies
नेटफ्लिक्सवरील ट्रेडिंग सिनेमांची यादी (फोटो- एआय)

५. बॉर्डर २

सनी देओलचा ‘बॉर्डर २’ चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे. २३ जानेवारीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट तीन आठवड्यांपासून ट्रेंडमध्ये आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटाचे रेटिंग ६.४ आहे.

६. अॅनाकोंडा

२०२५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अॅनाकोंडा’ चित्रपट सहाव्या क्रमांकावर आहे. गेल्या एका आठवड्यापासून हा नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत असून याचे रेटिंग ५.६ आहे.

७. सम्प्रदायनि सुप्पिनि सुधापूसानि:

सातव्या क्रमांकावर हा तेलगू चित्रपट आहे. सुधीर श्रीराम यांनी याचे दिग्दर्शन केले असून याचे रेटिंग ५.६ आहे.

८. हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस

इम्रान खान व वीर दास यांचा हा चित्रपट आठव्या क्रमांकावर आहे. वीर दास आणि कवी शास्त्री यांनी याचे दिग्दर्शन केले असून याचे रेटिंग ४.९ आहे.

९. मेड इन कोरिया

नवव्या क्रमांकावर ‘मेड इन कोरिया’ हा तमिळ चित्रपट आहे. रा. कार्तिक दिग्दर्शित हा चित्रपट ४ आठवड्यांपासून ट्रेंडमध्ये असून याचे रेटिंग ६ आहे.

१०. विद लव

दहाव्या क्रमांकावर ‘विद लव’ हा तमिळ रोमँटिक चित्रपट आहे. पी. मदन दिग्दर्शित या चित्रपटाचे रेटिंग ७.७ आहे.