Netflix Top 10 Trending Movies list : नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग चित्रपटांची नवी यादी समोर आली आहे. या यादीत बॉलिवूड चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटांना पसंती मिळत असून त्याबद्दल चर्चा सुरू आहे. चला जाणून घेऊया, या यादीत कोणत्या चित्रपटांनी स्थान मिळवलं आहे.
‘वध २’ : नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा क्राइम थ्रिलर चित्रपट ‘वध २’ने स्थान मिळवलं आहे. हा चित्रपट ६ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. जसपाल सिंह संधू यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
‘मृत्युंजय’ : या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तेलुगू चित्रपट ‘मृत्युंजय’ आहे. यावर्षी ६ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात श्री विष्णू आणि रेबा मोनिका जॉन हे कलाकार झळकले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन हुसेन शाह किरण यांनी केलं आहे.
‘थ्रॅश’ : ‘थ्रॅश’ हा अमेरिकन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. टॉमी विर्कोला दिग्दर्शित या चित्रपटात Phoebe Dynevor, Whitney Peak आणि Djimon Hounsou हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे.
‘धुरंधर’ : एकीकडे रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, तर दुसरीकडे या चित्रपटाचा पहिला भाग नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
Sampradayini Suppini Suddapoosani : डार्क क्राइम कॉमेडी चित्रपट ‘सम्प्रदायिनी सुप्पिनि सुद्दपुसानि’ नेटफ्लिक्सवर पाचव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. हा चित्रपट ६ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली.
‘तू या मैं’ : आदर्श गौरव आणि शनाया कपूर यांचा थ्रिलर चित्रपट ‘तू या मैं’ १३ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सहाव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
‘मर्दानी ३’ : नेटफ्लिक्सवर सातव्या क्रमांकावर राणी मुखर्जीचा क्राइम थ्रिलर चित्रपट ‘मर्दानी ३’ ट्रेंड करत आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला होता. राणी मुखर्जीने पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय बनून दमदार पुनरागमन केलं आहे.
‘अॅनाकोंडा’ : पॉल रुड, जॅक ब्लॅक, स्टीव्ह झान, थॅंडीवे न्यूटन आणि सेल्टन मेलो यांच्या ‘अॅनाकोंडा’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर आठव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
‘वध’ : संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा ‘वध’ हा चित्रपट नवव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. तर सीक्वल पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता.
‘बॉर्डर २’ : सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांचा चित्रपट ‘बॉर्डर २’ नेटफ्लिक्सवर दहाव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
