Netflix Top 10 Trending Shows : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर सध्या अनेक नवनवीन आणि मनोरंजक शोज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आज नेटफ्लिक्सवर अव्वल स्थानावर ट्रेंड होणाऱ्या टॉप १० शोजची यादी समोर आली आहे. यामध्ये ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो सीझन ५’ ने पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे. तर परिणीती चोप्रा आणि जेनिफर विंगेटची ‘शक’ ही मिस्ट्री थ्रिलर सीरिज दुसऱ्या स्थानावर आहे. आज या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील टॉप १० ट्रेंडिंग शोबद्दल जाणून घेऊयात.

द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो सीझन 5

द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोचे मागचे चार सीझन सुपरहिट ठरले. आता पाचवा सीझन आला आहे. पाचव्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये दृश्यम ३ चे कलाकार आले. अजय देवगण, श्रिया सरण, जयदीप अहलावतच्या यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हा शो आज नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे.

शक

परिणीती चोप्रा,जेनिफर विंगेट, ताहिर राज भसीन यांची ही सीरिज सध्या नेटफ्लिक्सवर दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे. ही मिस्ट्री थ्रिलर सीरिज एका मुलीच्या अपहरणावर आधारित आहे.

चुंबक

नीना गुप्ता, देवेन भोजानी, सुमीत व्यास, सुमीत राघवन, संदीपा धर व अर्जुन बिजलानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेली चुंबक सीरिज सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. चुंबक ही कॉमेडी सीरिज नेटफ्लिक्सवर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे.

जाकीर खान -पापा यार

स्टँडअप कॉमेडियन झाकीर खानचा ‘पापा यार’ हा शो नेटफ्लिक्सवर तुफान चर्चेत आहे. चौथ्या क्रमांकावर ट्रेंडिंग हा शो तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता.

इंडियाज गॉट लेटेंट २

समय रैनाच्या या शोचा दुसरा सीझन खूपच चर्चेत आहे. मागील एपिसोडमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी, भुवन बाम व मुकेश छाबरा आले होते. तो एपिसोड एका आठवड्यापासून नेटफ्लिक्सवर ट्रेंड करतोय.

ऑपरेशन सफेद सागर

१९९९ सालच्या कारगिल युद्धाची गोष्ट ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये दाखवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ, जिमी शेरगिलसह अनेक दमदार कलाकारांची फौज आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर सहाव्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे.

मुसाफिर कॅफे

विक्रांत मॅस्सी, वेदिका पिंटो व महिमा मकवानाची मुख्य भूमिका असलेली ही रोमँटिक सीरिज नेटफ्लिक्सवर सातव्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे. याच्या दुसऱ्या सीझनची घोषणाही करण्यात आली आहे.

डबल इम्पॅक्ट

डबल इम्पॅक्ट ही एक डान्स रिअॅलिटी कॉम्पिटिशन सीरिज आहे. या सीरिजचे नवीन एपिसोड दर आठवड्याला रिलीज होतात. ही सीरिज आज आठव्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे.

द फायनल प्रॉब्लेम

ही स्पेनिश सीरिज नेटफ्लिक्सवर नवव्या क्रमांकावर ट्रेंड करतेय. ४ एपिसोड्सची मिस्ट्री-सस्पेन्स सीरिज तुम्ही इंग्रजीत पाहू शकता.

द जेंटलमन

द जेंटलमन नावाची जबरदस्त सीरिज नेटफ्लिक्सवर आज १० व्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे.