This Series Is Trending On OTT : तिन महिन्यांपूर्वी ओटीटीवर एक सीरिज प्रदर्शित झालेली. जिला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक आठवडे ही सीरिज ओटीटीवरील टॉप १० ट्रेंडिंग सीरिजच्या यादीत राहिली. यादरम्यान अनेक नवीन सीरिज प्रदर्शित झाल्या परंतु, या सीरिजची क्रेझ काही कमी झाली नाही.
गेल्या तिन महिन्यांपासून ओटीटीवर नेटफ्लिक्सवर ही सीरिज टॉप १०मध्ये आहे. ७ एपिसोडची ही सीरिज अनेकांच्या पसंती उतरली आणि अजूनही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात ही सीरिज पाहत आहेत. या सीरिजमध्ये तगडी स्टारकास्ट आहे आणि कथा इतकी रंजक आहे की पूर्ण सात एपिसोड पाहिल्या शिवाय तुम्ही जागेवरुन उठणार नाही. प्रत्येक एपिसोडमध्ये भरपूर रहस्य आणि थ्रिल आहे.
सीरिजची कथा काय आहे?
या सीरिजची कथा आंतरराष्ट्रीय तस्करी सिंडिकेटविरोधातील मोठ्या लढ्याभोवती फिरते. एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी आपल्या प्रामाणिक टीमसह अशा एका शक्तिशाली व्यक्तीचा सामना करतो जो सोन्याची तस्करी करत असतो. या धोकादायक मोहिमेत अनेक अपघातही घडतात.
इमरान हाश्मीसह अमृता खानविलकर आहे महत्त्वपूर्ण भूमिकेत
ज्या ७ एपिसोडच्या सीरिजबद्दल आपण बोलत आहोत ती म्हणजे इमरान हाश्मीची मुख्य भूमिका असलेली ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ (Taskaree: The Smuggler’s Web). या सीरिजमध्ये कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत अभिनेता इमरान हाश्मी यांने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्याने यामधून त्याच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली. तर इमरानसह या सीरिजमध्ये इतरही काही लोकप्रिय कलाकार आहेत. महत्त्वाचं म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तिने यामध्ये मिताली कामत ही भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकेचंही अनेकांनी कौतुक केलं.
याव्यतिरिक्त ‘तस्करी’ या सीरिजमध्ये अमृता व इमरान यांच्याबरोबर शरद केळकर, अनुराग सिंहा, जमील खान, फ्रेडी दारुवाल, जोया अफरोज, नंदिश सिंह सिंधू, सुमित निजवन ही कलाकार मंडळी आहेत.
१४ जानेवारी २०२६ मध्ये ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली. गेल्या तिन महिन्यांपासून ही सीरिज टॉप १०मध्ये ट्रेंडिंग आहे. सात एपिसोडच्या या स्सपेन्स आणि थ्रिलर सीरिजला आयएमडीबीवर ७.१ इतके रेटिंग आहे. तर नेटफ्लिक्सवर ही सीरिज टॉप १०मध्ये ६व्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे
