New Marathi Series Be Dune Teen: ‘बे दुणे तीन’ या मराठी सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आधुनिक नातेसंबंधांची आनंददायी अनागोंदी आणि मनाला भिडणारे बारकावे यांचा मिलाफ या विनोदी सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘बे दुणे तीन’मध्ये दीक्षा केतकर, विराजस कुलकर्णी आणि शुभांकर एकबोटे, क्षितिश दाते, पुष्करराज चिरपुटकर आणि शिवानी रांगोळे यांच्या भूमिका आहेत. या सीरिजमध्ये अभय आणि नेहा या एका अशा तरुण जोडप्याचा प्रवास दाखवितो ज्यांना एक नव्हे, तर तीन बाळ होणार आहेत.

या सीरिजचे दिग्दर्शन अथर्व सौंदणकर व हिमांशू पिले यांनी केले आहे. प्रेम, जिव्हाळा, विनोद आणि वास्तवविकता यावर बेतलेली ही कथा आहे. आश्चर्य आणि अविश्वास, गोंधळ, गैरसमज, आणि नव्याने फुलणारं प्रेम अशा विविध भावना यात पाहायला मिळतात. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य अशा तीन एकमेकांत गुंफलेल्या काळांमध्ये या मालिका पाहायला मिळेल.

या सीरिजमध्ये क्षितीश दाते अभयची भूमिका साकारत आहे. त्याने आपल्या भूमिकेबद्दल सांगितलं. “बे दुणे तीन ही खरोखरच वास्तवाच्या खूप जवळ वाटणाऱ्या कथांपैकी एक आहे. अभय एकाच वेळी प्रेम, जबाबदारी, भीती आणि उत्साह यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे. हे पात्र साकारल्यामुळे मला अशा वेगळ्या भावना अनुभवण्याची संधी मिळाली. एका क्षणातच एक नव्हे तर तीन बाळांचा बाबा होण्याची कल्पना, त्यामुळे होणारा गोंधळ; दुसरीकडे एक सुंदर हळवेपणा असे विविध पैलू अनुभवता आले. या सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. प्रत्येक जोडपं आणि प्रत्येक कुटुंब अभय आणि नेहाच्या प्रवासात स्वतःचे थोडेसे तरी रूप पाहतील, असे मी खात्रीने सांगतो,” असं क्षितीश दाते या मालिकेबद्दल म्हणाला.

पाहा ट्रेलर

‘बे दुणे तीन’ ही मालिका ५ डिसेंबर पासून खास मराठी ZEE5 वर, प्रसारित होणार आहे.