New OTT Release This Week : या आठवड्यात ओटीटीवर काय पाहायचं? असा विचार तुम्ही करत असाल तर आम्ही तुम्हाला सर्व कलाकृतींची यादी सांगणार आहोत. या आठवड्यात अनेक नवीन दाक्षिणात्य चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. यात सायकॉलॉजिकल थ्रिलर्सपासून ते रोमँटिक कॉमिक्स आणि सस्पेन्स थ्रिलर्स या जॉनरच्या कलाकृतींचा समावेश आहे. वीकेंडचा प्लॅन नसेल, तर यापैकी तुम्ही काय बघणार आहात, ते ठरवून घ्या.
रेगई
‘रेगई’ हा तमिळ क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. यात सब-इन्स्पेक्टर वेत्रीची कथा दाखवण्यात आली आहे. तो एका गूढ हत्या प्रकरणाचा तपास करत असतो. तपासादरम्यान तो मेडिकल ट्रायलशी संबंधित एका भयानक कटापर्यंत जाऊन पोहोचतो. त्याच्या विश्वासू साथीदारासह, तो वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी क्लिनिकल ट्रायलसाठी निष्पाप रुग्णांच्या हत्येचा कट कशा पद्धतीने रचला जातो ते उघड करतो. बाला हसन आणि विनोथिनी वैद्यनाथन या रोमांचक चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. २८ नोव्हेंबरपासून ZEE5 वर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.
आर्यन
‘आर्यन’ हा सायकोलॉजिकल थ्रिलर तमिळ चित्रपट आहे. यात एका मध्यमवयीन लेखकाची कथा दाखवण्यात आली आहे. अपयशानंतर तो हिंसक होत जातो. तो एका टेलिव्हिजन स्टुडिओमध्ये घुसतो, क्रूला ओलीस ठेवतो आणि पुढील पाच दिवसांत तो पाच गुन्हे करेल अशी घोषणा करतो. त्याच्या कबुलीजबाबानंतर डीसीपी नंबी यांच्या नेतृत्वाखालील टीम तपास सुरू करते. लेखल हत्येच्या फक्त एक तास आधी प्रत्येक व्यक्ती जिचा तो खून करणार त्याची संभाव्य ओळख उघड करून पोलिसांना आव्हान देतो. २८ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
द पेट डिटेक्टिव्ह
द पेट डिटेक्टिव्ह हा एक मल्याळम अॅक्शन-कॉमेडी सिनेमा आहे. यात एका तरुण जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. एक खोडकर मकाव पोपट या दोघांच्या घरात घुसतो आणि बाहेर पडण्यास नकार देतो. त्यानंतर दोघे त्रासून जातात. पुढे त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं, हे या सिनेमात पाहता येईल. या सिनेमात शराफ यू धीन, विनायकन, विनय फोर्ट आणि अनुपमा परमेश्वरन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट तुम्ही झी5 वर २८ नोव्हेंबरपासून पाहू शकता.
शेड्स ऑफ लाइफ
‘शेड्स ऑफ लाईफ’ हा मल्याळम चित्रपट आहे. एका गावाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. हा चित्रपट लोकांच्या दैनंदिन संघर्षांबद्दल भाष्य करतो. यात नियास बॅकर, भास्कर अरविंद, श्रीजा दास, कार्तिक, दासन कोंगड, रमाणी मंचेरी, एस.के. मिनी आणि अश्वथी मोहनन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २१ नोव्हेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्म मनोरमा मॅक्सवर पाहता येईल.
उसिरू
हा एक कन्नड थ्रिलर चित्रपट आहे. यात दोन समांतर कथा दाखवण्यात आल्या आहेत. पहिल्या कथेत एक पोलीस आपल्या पत्नीला एका धोकादायक गुन्हेगारापासून वाचवण्यासाठी धडपडत असतो. तर दुसऱ्या कथेत एक किशोरवयीन मुलगा त्याच्या पालकांच्या हत्येचं गूढ सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या चित्रपटात पुढे चक्रावून सोडणारे ट्विस्ट येतात. २१ नोव्हेंबरला उसिरू सननक्स्टवर रिलीज झाला आहे.

