New OTT Release This Week Netlfix Prime Video ZEE5 Hotstar: नेहमीप्रमाणेच या आठवड्यातही चित्रपटगृह आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन चित्रपट आणि थरारक वेब सीरिज रिलीज होणार आहेत. जर तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायचा नसेल, तर काळजी करू नका. ८ जून ते १४ जून २०२६ या काळात डिजिटल प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे. यामध्ये बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, वामिका गब्बी आणि राजपाल यादव यांच्या मुख्य भूमिका असलेला आणि प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’ हा चित्रपट अखेर थिएटरनंतर नेटफ्लिक्सवर येत आहे. याशिवाय अली फजल आणि सोनाली बेंद्रे यांची क्राईम इन्व्हिस्टिगेशन सीरिज ‘राख’ प्राईम व्हिडिओवर धमाका करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात ओटीटीवर काय काय नवीन पाहायला मिळणार आहे.
चित्रपटगृहांमध्ये १२ जून रोजी ‘मैं वापस आऊंगा’, ‘भारत भाग्य विधाता’, ‘गव्हर्नर’ आणि ‘हॉन्टेड ३डी’ हे चित्रपट रिलीज होत आहेत. जर तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायला आवडत नसेल, तर आम्ही तुम्हाला ८ जून ते १४ जून या काळात डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि सीरिज बद्दल सांगणार आहोत. वीकेंडला तुम्ही घरबसल्या यांचा आनंद घेऊ शकता.
भूत बंगला
Bhoot Bangla on OTT : अक्षय कुमार, वामिका गब्बी, राजपाल यादव आणि दिवंगत अभिनेते असरानी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भूत बंगला’ हा चित्रपट एप्रिलमध्ये चित्रपटगृहात रिलीज झाला होता. आता साधारण दीड महिन्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर आता तुम्ही तो नेटफ्लिक्सवर घसबसल्या पाहू शकता. हा चित्रपट १२ जून रोजी रिलीज होणार आहे.
मां है ना
Maa Hai Na on OTT : चित्रपट आणि सीरिज व्यतिरिक्त ‘मां है ना’ हा एक कुकिंग शो देखील या आठवड्यात सुरू होत आहे. या शोमध्ये आजच्या पिढीचे सेलिब्रिटी त्यांच्या आईसोबत सहभागी होणार आहेत. १० भागांचा हा शो सहा सेलिब्रिटी आणि त्यांच्या आईला एकत्र स्वयंपाकघरात आणेल. ‘मां है ना’ १२ जून पासून झी५ वर पाहता येईल.
राख
Raakh on Prime Video: या आठवड्यात अभिनेता अली फजलची ‘राख’ ही वेब सीरिज देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यामध्ये सोनाली बेंद्रे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘पाताळ लोक’चे दिग्दर्शक प्रोसित रॉय यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. ही क्राइम इन्व्हिस्टिगेशन सीरिज १२ जून रोजी प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
ड्रिडम
Dridam on OTT : या यादीत ‘ड्रिडम’ या मल्याळम चित्रपटाचाही समावेश आहे. चित्रपटगृहानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर येत आहे. हा क्राईम थ्रिलर चित्रपट एका पोलिसाच्या कथेवर आधारित असून, तो १२ जून रोजी जिओ हॉटस्टारवर पाहता येईल. तसेच ‘तारकटा’ आणि ‘करुपू’ हे चित्रपटही १२ जून रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहेत.
