Korean psychological Horror Movie On Ott : हॉरर, सायकॉलॉजिकल आणि थ्रिलर या धाटणीच्या चित्रपटांचा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. सध्या या जॉनरची प्रेक्षकांमध्ये खूपच क्रेझ आहे. त्यामुळे जर तुम्हालासुद्धा हॉरर आणि सायकॉलॉजिकल थ्रिलर अशा धाटणीचे चित्रपट पाहायला आवडत असतील तर आम्ही तुम्हाला ओटीटीवरील अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत जो खूपच भयावह आहे. एकट्यात चुकूनही हा सिनेमा पाहू नका.

ओटीटीवरील ज्या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो एक साऊथ कोरियन चित्रपट आहे. कोरियन कलाकृतींची सध्या सर्वत्रच खूप क्रेझ आहे. पण, यामध्ये के-ड्रामा अशा रोमँटिक कलाकृतींना खूप पसंती मिळते. पण, आता आम्ही तुम्हाला अशा एका खतरनाक हॉरर साऊथ कोरियन चित्रपटाबद्दल सांगणार आहोत जो ओटीटीवर हिंदीत पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

हा साऊथ कोरियन हिंदीसह इतरही भाषेत हा चित्रपट पाहता येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हीसुद्धा कोरियन चित्रपटांचे चाहते असाल किंवा हॉरर या धाटणीचे चित्रपट पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट घरबसल्या पाहण्याची संधी आहे. यामध्ये प्रत्येक सीनमध्ये रहस्य आणि भीती वाटेल असे अंगावर शहारे आणणारे दृश्ये आहेत. कोणता आहे हा चित्रपट आणि कुठे पाहता येईल? जाणून घेऊयात…

चित्रपटाचं नाव आणि कथा

या हॉरर सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचं नाव आहे ‘नॉईज’ (Noise). नावाप्रमाणेच चित्रपटातही खूप आवाज, आरडा-ओरडा आहे. किम सू जिन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात दोन बहिणी असतात ज्यामधील एक अचानक बेपत्ता होते. जू-यंग नावाची मुलगी असते. जिला ऐकू येत नसतं त्यामुळे ती हिअरिंग एड वापरते. नवीन घरात राहायला गेल्यानंतर तिची बहीण अचानक बेपत्ता होते. बहिणीचा शोध घेताना तिला समजतं की, घरात येणाऱ्या विचित्र आवाजांचा तिच्या बहिणीच्या गायब होण्याशी काहीतरी संबंध आहे. चित्रपटातील प्रत्येक सीनमध्ये रहस्य, भीती आणि थरारक दृष्ट आहेत.

ओटीटीवर कुठे पाहता येईल

किम सू जिन दिग्दर्शित ‘नॉईज’ हा हॉरर सायकॉलॉजिकल थ्रिलर तुम्ही घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता. हिंदीसह इतरही भाषेत पाहण्यासाठी उपलब्ध असलेला हा चित्रपट तुम्ही ‘जिओ हॉटस्टार’वर पाहू शकता.