गेल्या काही वर्षांत, खासकरून २०२० नंतर, प्रेक्षकांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. आज नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, डिस्ने+ हॉटस्टार आणि जिओ सिनेमा यांसारखी माध्यमे घराघरांत पोहोचली आहेत. ओटीटीमुळे चित्रपट पाहण्यासाठी आता थिएटरमध्ये जाण्याची किंवा ठराविक वेळेची वाट पाहण्याची गरज उरलेली नाही. प्रेक्षक आपल्या सोयीनुसार, कधीही आणि कोठेही अगदी प्रवासात, घरी किंवा कामाच्या ब्रेकमध्ये मोबाईल किंवा स्मार्ट टीव्हीवर चित्रपट पाहू शकतात.

ओटीटीवर केवळ बॉलिवूड किंवा हॉलीवूडच नाही, तर प्रादेशिक चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंटेंट उपलब्ध आहे. यामुळे प्रेक्षकांना जागतिक दर्जाचे सिनेमे एका क्लिकवर पाहायला मिळत आहेत. लोक अनेकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही सर्वोत्कृष्ट चित्रपट पुन्हा पुन्हा पाहत असतात. काही चित्रपटांबद्दलच्या कथा जगभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. आज आम्ही अशा चित्रपटाबद्दल सांगत आहोत ज्याची कथा तयार होण्यासाठी तब्बल २० वर्षे लागली. २ तास ४१ मिनिटांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती.

बॉक्स ऑफिसवर १७५० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने ऑस्करमध्ये नामांकनांचा विक्रम केला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता यासह १३ ऑस्कर नामांकनं मिळाली होती. विशेष म्हणजे, त्याचे संवाद आणि कथा चित्रपटप्रेमींमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असते. हा चित्रपट कोणता व तो कुठे पाहता येईल, ते जाणून घेऊयात.

Award Banner

चित्रपटाचं नाव काय? कुठे पाहायचा?

या चित्रपटाचं नाव ‘वन बॅटल आफ अनादर’ आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की कथा लिहिण्यासाठी २० वर्षे लागली. हा त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या व महागड्या चित्रपटांपैकी एक होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १७५० कोटी रुपये कमावले होते. भारतात, हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहता येईल ४९९ रुपयांमध्ये रेंटवर उपलब्ध आहे.

चित्रपटाची कथा काय?

या चित्रपटाची कथा बॉबभोवती (लिओनार्डो डिकॅप्रियो) फिरते. तो एक माजी क्रांतिकारक आहे. तो त्याची मुलगी विला (चेस इन्फिनिटी) हिच्याबरोबर एका राहतो. पण १६ वर्षांनंतर, बॉबच्या आयुष्यात एक ट्विस्ट येतो. बॉबचा जुना शत्रू परत येतो आणि त्याची मुलगी गायब होते. यामुळे बॉबला पुन्हा एकदा त्याच्या भूतकाळाचा सामना करावा लागतो. स्टार कास्टमध्ये बेनिसियो डेल टोरो, रेजिना हॉल आणि टेयाना टेलर सारखे प्रसिद्ध कलाकार आहेत. २ तास ४१ मिनिटांच्या या चित्रपटात अ‍ॅक्शन, थ्रिलर आणि ब्लॅक कॉमेडी यांचा मिलाफ पाहायला मिळतो.