scorecardresearch

२०२३ चा सर्वात मोठा चित्रपट ‘ओपनहायमर’ OTT वर; ‘या’ प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार पण…

Oppenheimer On OTT: ‘ओपनहायमर’च्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने एका खास व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे

oppenheimer-ott
फोटो : सोशल मीडिया

Oppenheimer On OTT: सिनेरसिक ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची फारच आतुरतेने वाट पहात असतात. त्याच्या चित्रपटाची क्रेझ आपल्या भारतातही प्रचंड बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘ओपनहायमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. भारतात गेले काही दिवस या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. अणूबॉम्बचे जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. भारतात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

सामान्य प्रेक्षक, नोलनचे चाहते तसेच चित्रपट समीक्षक यांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. चित्रपटातील काही सीन्समुळे तसेच भगवद्गीतेच्या संदर्भामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला पण त्याचा चित्रपटाच्या कमाईवर फारसा परिणाम झाला नाही. चित्रपटगृहामध्ये सुपरहीट ठरलेल्या या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मध्यंतरी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर काही मीडिया रीपोर्टनुसार अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने ‘ओपनहायमर’चे हक्क विकत घेतले असून याच प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली, परंतु नेमकी तारीख स्पष्ट झालेली नसल्याने प्रेक्षक फारच संभ्रमात पडले.

tejas-trailer
Tejas Trailer: “ये वो भारत है…” कंगना रणौतच्या ‘तेजस’चा ट्रेलर प्रदर्शित; दमदार भूमिकेत दिसणार बॉलिवूडची ‘क्वीन’
jawan
शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर घालणार धुमाकूळ; वाचा कधी व कुठे पाहता येणार?
girija oak
Video: “हजार साल के गुलामी के पीछे…” विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा बेधडक अंदाज, म्हणाली…
the-vaccine-wae-trailer
The vaccine War Trailer : “India Cant Do It…” विवेक अग्निहोत्रींच्या बहुचर्चित ‘द व्हॅक्सीन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित

आणखी वाचा : The Railway Men Review: भोपाळ दुर्घटनेवर बेतलेली आटोपशीर, अभ्यासपूर्ण अन् अस्वस्थ करणारी दर्जेदार सीरिज

आता याबाबतीत चित्र स्पष्ट झालं आहे. ‘ओपनहायमर’च्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने एका खास व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. ‘ओपनहायमर’ हा चित्रपट २२ नोव्हेंबरपासून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. परंतु यातही एक ट्विस्ट आहे. हा चित्रपट सगळ्यांनाच सरसकट पाहायला मिळणार नसून यासाठी अतिरिक्त पैसे भरावे लागणार आहेत.

तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर असाल किंवा नसाल तुम्हाला १४९ रुपये भरून प्राइम स्टोअरमध्ये हा चित्रपट रेंटवर घेऊन पाहता येणार आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना या चित्रपटाचा आनंद घ्यायचा आहे ते प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा आनंद घेऊ शकतात. या चित्रपटात ओपनहायमर यांची भूमिका अभिनेता सिलियन मर्फीने केली आहे. त्याच्याबरोबरच रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, रामी मलिक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Oppenheimer movie will be streaming on amazon prime video on early rental access avn

First published on: 21-11-2023 at 17:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×