या वीकेंडला ओटीटीवर नवीन काय पाहायचं, असा विचार करणाऱ्यांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. चित्रपट आणि सीरिज प्रेमींसाठी हा आठवडा खूप खास असणार आहे, कारण बऱ्याच सीरिज अन् चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर रिलीज झाले आहेत. या यादीत अनन्या पांडेचा ‘कॉल मी बे’ ते राघव जुयालचा ‘किल’ आणि ईशान खट्टरची ‘परफेक्ट कपल’ ही सीरिज यांचा समावेश आहे. कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोणत्या कलाकृती पाहता येतील, ते जाणून घेऊयात.
कॉल मी बे (Call Me Bae)
बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आता ओटीटीवर सीरिजच्या माध्यमातून पदार्पण करत आहे. तिची कॉल मी बे या सीरिजचा पहिला भाग प्राईम व्हिडिओवर शुक्रवारी ६ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. सीरिजचे दिग्दर्शक कॉलिन डी कुन्हा आहेत. ही कॉमेडी ड्रामा सीरिज आहे. यात अनन्या श्रीमंत फॅशनिस्टा बेच्या भूमिकेत दिसणार आहे.
Call Me Bae to Sector 36: सप्टेंबर महिन्यात OTT वर येणार ‘हे’ चित्रपट अन् सीरिज; वाचा संपूर्ण यादी
किल (Kill)
राघव जुयाल आणि लक्ष्य लालवानी यांच्या मुख्य भूमिका असलेला ॲक्शन चित्रपट किल या वर्षी जुलैमध्ये सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता निखिल नागेश भट्ट दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट Disney+ Hotstar वर पाहता येईल. कमी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने थिएटरमध्येही चांगली कमाई केली.
बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी
तनाव 2 (Tanaav Season 2)
२०२२ साली प्रदर्शित झालेली तनाव ही सीरिज लोकांना खूप आवडली होती. आता त्याचा सीझन २ ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर प्रदर्शित झाला आहे. या सीझनमध्ये पुन्हा एकदा स्पेशल टास्क फोर्सची गोष्ट पाहायला मिळणार आहे. टीम यावेळी नवीन प्रकरणं सोडवताना दिसेल. या सीरिजचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा आणि ई निवास यांनी केलं आहे. या सीरिजमध्ये अरबाज खान, सत्यदीप मिश्रा, अर्सलान गोनीसह अनेक स्टार्स आहेत.
सत्य घटनांवर आधारित ‘या’ १२ सुपरहिट भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का? OTT वर आहेत उपलब्ध
परफेक्ट कपल (Perfect Couple)
द परफेक्ट कपल ही हॉलीवूड सीरिज आहे. यामध्ये अभिनेत्री निकोल किडमन आणि बॉलीवूड अभिनेता ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. ही सीरिज शुक्रवारी, ६ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली आहे. सुझान बियर दिग्दर्शित या सीरिजची निर्मिती जॉन स्टार्कने केली आहे. ही सीरिज २०१८ मध्ये आलेल्या एलिन हिल्डरब्रँडच्या कादंबरीवर आधारित आहे. ही क्राइम आणि मिस्ट्री ड्रामा सीरिज आहे.
विस्फोट (Visfot)
फरदीन खान आणि रितेश देशमुख स्टारर चित्रपट ‘विसफोट’ देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. हा चित्रपट जिओ सिनेमावर पाहता येईल.