OTT Release This Week : वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर आला आहे आणि हा महिना मनोरंजन प्रेमींसाठी खास असेल. या महिनाभरात अनेक मोठे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज येणार आहेत. तसेच अनेक चित्रपट व सीरिज ओटीटीवरही प्रदर्शित होणार आहेत. जर तुम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि शो पाहायला आवडत असतील, तर डिसेंबरमधील कलाकृतींची यादी जाणून घ्या.

अमरन

Amaran on OTT : साई पल्लवी व शिवकार्तिकेयन यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘अमरन’ आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट एका महिन्यापूर्वी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण आता महिनाभरानंतर तो ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘अमरन’ चित्रपट ५ डिसेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
baby john ott release
Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या
Lagira Zhala Ji fame kiran dhane appear in Ude Ga Ambe serial
Video: ‘लाागिरं झालं जी’मधील जयडी आली परत, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार

हेही वाचा – रेखा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोबद्दल म्हणाल्या, “मला विचार…”

मटका

Matka on OTT : वरुण तेज, मीनाक्षी चौधरी, नोरा फतेही आणि सत्यम स्टारर चित्रपट ‘मटका’ १४ नोव्हेंबरला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाई करू शकला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन करुणा कुमार यांनी केले आहे. आता हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर ५ डिसेंबरला तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा – “मागील काही वर्षे खूपच…”, अभिनेता विक्रांत मॅसीने केली निवृत्तीची घोषणा? म्हणाला, “शेवटचे दोन चित्रपट अन्…”

अग्नी

Agni on OTT : प्रतीक गांधी आणि दिव्येंदू यांचा ‘अग्नी’ हा चित्रपट आता ओटीटीला रिलीज होणार आहे. आगीच्या वाढत्या घटनांनी त्रस्त असलेल्या शहरात, फायरमन विठ्ठल आणि त्याचा पोलीस भाऊ सुमित हे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकत्र येतात हे यात पाहायला मिळतं. हा चित्रपट ६ डिसेंबरला प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

जिगरा

Jigra on OTT : आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांचा ‘जिगरा’ चित्रपट ऑक्टोबर महिन्यात थिएटरमध्ये रिलीज झाला. या सिनेमात आलियाने वेदांगच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यात आलियाचा जबरदस्त ॲक्शन अवतारही पाहायला मिळाला. हा चित्रपट तुम्हाला ६ डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

हेही वाचा – Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक

मायरी

Maeri on OTT : ‘मायरी’ ही एक टीव्ही सीरिज आहे, ज्यामध्ये तन्वी मुंडलेची भूमिका आहे. सचिन दरेकर निर्मित आणि दिग्दर्शित, ही एक रिव्हेंज ड्रामा सीरिज आहे. यात सस्पेन्स, मानवी नातेसंबंध आणि वैयक्तिक संघर्ष पाहायला मिळतो. तुम्ही ही सीरिज ६ डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर पाहू शकता.

तनाव सीजन 2

Tanaav Season 2 on OTT : ‘तनाव’चा पहिला सीझन हिट झाल्यानंतर आता त्याचे निर्माते या सीरिजचा दुसरा सीझन घेऊन येत आहेत. मानव विज, कबीर बेदी आणि रजत कपूर ही जोडी ‘तनाव सीझन 2’ मध्ये दिसणार आहे. ही सीरिज ६ डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर रिलीज होईल.

Story img Loader