OTT Release This Week: आजकाल लोक थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि सीरिज पाहणं पसंत करतात. त्यामुळे निर्माते डिजिटल प्लॅटफॉर्मवर सातत्याने नवीन कंटेंट रिलीज करत असतात. थिएटरमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट बहुतेकदा दीड ते दोन महिन्यांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतात. यामुळे ओटीटी प्रेक्षकांना मनोरंजनाचा दुहेरी डोस मिळतो.
फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातही तुम्हाला मनोरंजनासाठी बरेच पर्याय मिळणार आहेत. १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान, ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक रोमांचक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होतील. यामध्ये अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’ पासून ‘द नाईट एजंट ३’ यांचा समावेश आहे.
56 डेज
56 Days on OTT : कॅथरीन रायन हॉवर्ड यांच्या कादंबरीवर आधारित ‘५६ डेज’ हा ऑलिव्हर केनेडी आणि सियारा वाईज यांच्यावरील एक इरॉटिक थ्रिलर चित्रपट आहे. ते एका सुपरमार्केटमध्ये भेटतात आणि त्यांच्यात नातेसंबंध सुरू होतात. मग ५६ दिवसांनी त्यांच्या घरात एक मृतदेह आढळतो आणि कथा याभोवतीच फिरते. १८ फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडीओवर या सिनेमाचा प्रीमियर होणार आहे.
तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी
Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri on OTT: कार्तिक आर्यन व अनन्या पांडेचा ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ २०२५ मध्ये ख्रिसमसच्या दिवशी रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. आता तो प्राइम व्हिडीओवर १९ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
द नाइट एजंट 3
The Night Agent 3 on OTT : ‘द नाईट एजंट’ च्या दोन सीझननंतर, आता त्याचा तिसरा सीझन सुरू होत आहे. ही हॉलीवूड अॅक्शन स्पाय थ्रिलर सीरिज आहे. ही सीरिज १९ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
केनेडी
Kennedy on OTT : ‘केनेडी’ चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात सनी लियोनी, राहुल भट्टसह बरेच कलाकार आहे. याची कथा एका पोलिसाभोवती फिरते. त्याचा मृत्यू झाला आहे, असं लोकांना वाटतं, पण तो पोलीस विभागातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी काम करत असतो. तुम्ही हा चित्रपट २० फेब्रुवारीपासून झी5 वर पाहू शकता.

