OTT Release This Week : दर आठवड्याला ओटीटीवर काहीतरी नवीन प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतं. नवनवीन सीरिज व चित्रपट ओटीटीवर रिलीज होत असतात, त्यामुळे या आठवड्याला वीकेंडला घरी बसून काय पाहता येईल याच्या शोधात अनेक जण असतात, म्हणून आम्ही या आठवड्यात तुम्हाला घरी बसून काय पाहता येणार आहे याबद्दल सांगणार आहोत.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकप्रिय कलाकारांच्या विविध कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये हिंदी ते आंतरराष्ट्रीय अनेक कलाकृतींचा समावेश आहे, ज्या तुम्हाला घरबसल्या पाहायला मिळणार आहेत. यामध्ये कोणत्या कलाकारांच्या सीरिज व चित्रपटांचा समावेश आहे, तसंच या सर्व कलाकृती कुठे पाहता येतील जाणून घेऊयात…
या आठवड्यात रिलीज होणार ‘या’ कलाकृती
‘हॅप्पी पटेल’ – आमिर खानची निर्मिती असलेला आणि वीर दास व कवी शास्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘हॅपी पटेल’ हा एक स्पाय रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. त्यामध्ये वीर दास मुख्य भूमिकेत आहे. तसेच मिथिला पालकर ही मराठमोळी अभिनेत्रीही महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकत आहे. १ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
मृत्युंजय – अलीकडेच ६ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेला मृत्युंजय हा चित्रपट आता या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. अभिनेता श्री विष्णू यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ३ एप्रिलला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
XO किटी सीझन ३ – या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या यादीत कोरियन ड्रामा ‘XO किटी सीझन ३’चाही समावेश आहे. या चित्रपटाच्या पूर्वीच्या दोन सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, तर अजूनही त्यांच्यामध्ये या चित्रपटाची क्रेझ कायम असल्यानं आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची आतुरतेनं वाटत पाहत आहेत. २ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
सितारे जमीन पर – आमिर खानची मुख्य भूमिका असलेला हा एक कॉमेडी चित्रपट आहे. २०२५ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटानं चांगली कमाई केलेली. अशातच आता ३ एप्रिल रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.
ब्लडहाउंड्स सीझन २ – ‘ब्लडहाउंड्स सीझन २’ चित्रपटसुद्धा या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. यामध्ये Woo Do-hwan आणि Lee Sang-yi मुख्य भूमिकांमध्ये आहेत. ही सीरिज ३ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
वध २ – नीना गुप्ता व संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘वध २’ ३ एप्रिल रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसरा भाग प्रदर्शित होत आहे.
भाभी जी घर पर है फन द रन – ‘भाभी जी घर पर है फन द रन’ हा चित्रपटसुद्धा ओटीटीवर रिलीज होणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झालेला. अशातच आता झी ५ वर हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे.
मामला लीगल है सीझन २ – ‘मामला लीगल है सीझन २’ या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये पटपडगंज जिल्हा न्यायालयातील वकील आणि त्यांचे अनोखे खटले पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. यावेळी रवी किशन (व्ही. डी. त्यागी) वकिलातून न्यायाधीश बनले आहेत. या सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती, तर सीझन २ हा ३ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.
मा का सम – या सीरिजमध्ये मोना सिंह आणि मिहिर आहुजा मुख्य भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटाची गोष्ट १९ वर्षांच्या गणितात हुशार असलेल्या मुलाची आहे. या आठवड्यात ३ एप्रिल रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होत आहे.
