OTT Release This Week: जानेवारी महिना लवकरच संपणार आहे आणि मनोरंजनाच्या बाबतीत, या महिन्यात अनेक उत्कृष्ट चित्रपट थिएटरमध्येच व डिजिटल प्लॅटफॉर्मवरही आले आहेत. यामध्ये ‘मस्ती ४’, ‘चिकाटिलो’, ‘मार्क’, ‘सिराई’ आणि ‘तेरे इश्क में’ यांचा समावेश आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि सीरिजबद्दल जाणून घेऊयात.

गुस्ताख इश्क

Gustaakh Ishq on OTT : विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह व फातिमा सना शेख यांच्या भूमिका असलेली रोमँटिक ड्रामा सीरिज ‘गुस्ताख इश्क’ २७ जानेवारीला जिओ हॉटस्टारवर रिलीज झाली. गुस्ताख इश्कची कथा ‘नवाबुद्दीन’ भोवती फिरते. तो आपल्या वडिलांचा वारसा जपण्यासाठी त्यांची प्रिंटिंग प्रेस वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. यादरम्यान त्याला ‘अजीज बेग’च्या काही कविता सापडतात. मग तो कविता छापण्यासाठी ‘अजीज’ला भेटायला जातो, तिथे त्याची भेट अजीजची मुलगी मिन्नीशी होते.

व्हील ऑफ फॉर्च्यून

Wheel Of Fortune on OTT: चित्रपटांपासून दूर असलेला अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ या शोमुळे चर्चेत आहे. यात साजिद खान आणि रितेश देशमुखही दिसणार आहेत. हा शो २७ जानेवारी रोजी प्रीमियर होणार आहे आणि तो ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्ह तसेच सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहता येईल.

Award Banner

धुरंधर

Dhurandhar on OTT : रणवीर सिंह, अक्षय खन्ना व अर्जुन रामपाल यांचा ‘धुरंधर’ ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने ७ आठवड्यात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. धुरंधरने भारतात ८०० कोटी आणि जगभरात १००० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. आता धुरंधर ३० जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

दलदल

Daldal on OTT: भूमी पेडणेकरची क्राइम थ्रिलर सीरिज ‘दलदल’ या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा ट्रेलर लाँच झाला. अमृत राज गुप्ता दिग्दर्शित ही सीरिज ३० जानेवारी रोजी प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.

द 50

The 50 on OTT : ‘बिग बॉस’नंतर आता ‘द 50’ नावाचा नवीन रिअॅलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये ५० स्पर्धक सहभागी होतील. यात करण पटेल, रिद्धी डोगरा, मोनालिसा, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, शिव ठाकरे, जान्हवी किल्लेकर, विक्रांत सिंह, सपना चौधरी, नीलम गिरी, फैजल शेख, मनीषा रानी, रजत दलाल, प्रिंस नरूला, लवकेश कटारियासह अनेक स्पर्धक दिसतील. या शो १ फेब्रुवारीपासून जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.