OTT Release this week :ओटीटीवर या आठवड्यात अनेक चित्रपट व सीरिज रिलीज होणार आहेत. या आठवड्यातील रिलीज होणाऱ्या कलाकृतींच्या यादीत ‘हिसाब बराबर’ या चित्रपटाचा समावेश आहे. तसेच मिथिला पालकरचाही एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणते चित्रपट व सीरिज रिलीज होणार, त्याची यादी जाणून घेऊयात.

हिसाब बराबर

Hisaab Barabar on OTT: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक झालेला आर माधवनचा ‘हिसाब बराबर’ हा चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे जो हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक आणि घोटाळ्यावर आधारित आहे. या चित्रपटात आर माधवन व नील नितीन मुकेश, कीर्ती कुल्हारी, रश्मी देसाई आणि अनिल पांडे यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी Zee5 वर प्रसारित होईल.

OTT Release In February first week
या वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं? वाचा वेब सीरिज व चित्रपटांची यादी!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
sai tamhankar
सई ताम्हणकर लवकरच देणार खास सरप्राईज; पोस्ट शेअर करीत म्हणाली, “३ तारखेला…”
shirish more suicide letters
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या चार चिठ्ठ्या
Billionaire and spiritual leader the Aga Khan dies
Aga Khan dies : अब्जावधी रुपयांचं दान करणारे धर्मगुरु प्रिन्स आगा खान काळाच्या पडद्याआड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
donald trump victory celebration india
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर आंध्र प्रदेशमधील या गावाला विकासाची अपेक्षा, गावात ट्रम्प यांच्या विजयाचा जल्लोष; कारण काय?
suriya move to mumbai with wife jyothika and children
‘हा’ साऊथ सुपरस्टार पत्नी अन् मुलांसह मुंबईत झाला स्थायिक; म्हणाला, “या शहरातील शांती आणि…”

स्वीट ड्रीम्स

Sweet Dreams on OTT: अमोल पाराशर व मिथिला पालकर एका गोड लव्ह स्टोरीतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘स्वीट ड्रीम्स’ ही केनी आणि दिया या दोन अनोळखी व्यक्तींची कथा आहे, जे खऱ्या आयुष्यात कधीही भेटले नाहीत. पण ते स्वप्नात एकमेकांना पाहतात. ही विचित्र घटना त्यांना एकमेकांना शोधण्यास भाग पाडते, जी पुढे एका जादुई प्रेमकथेत बदलते. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट २४ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.

द नाईट एजंट सीझन २

स्पाय-अ‍ॅक्शन-थ्रिलर ‘द नाईट एजंट’चा दुसरा सीझन आला आहे. या सस्पेन्स, थ्रिलर सीरिजमध्ये ब्रिटनी स्नो, बर्टो कोलन, लुईस हर्थम आणि टेडी सियर्स यांच्याही भूमिका आहेत. ही सीरिज मॅथ्यू क्विर्क यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. ‘द नाईट एजंट सीझन २’ आज २३ जानेवारीपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

हार्लेम सीझन 3

‘हार्लेम’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन देखील या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा या सीरिजचा शेवटचा सीझन आहे. ‘हार्लेम सीझन ३’ आज २३ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

द ट्रॉमा कोड : हिरोज ऑन कॉल

साऊथ कोरियन सीरिज ‘द ट्रॉमा कोड: हीरोज ऑन कॉल’ ही मेडिकल ड्रामा सीरिज २४ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. यात ऑपरेशन थ‍िएटर व सर्जन्सचे जग दाखवण्यात आले आहे.

Dìdi

यात एका शाळकरी मुलाला एका मुलीवर क्रश असतो, तिच्यासाठी तो स्केटिंग सुरू करतो आणि स्केट कल्चर समजण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट २६ जानेवारीपासून जिओ सिनेमावर पाहता येईल.

शाफ्टेड

‘शाफ्टेड’ हा स्पॅनिश कॉमेडी सीरिज ‘अल्फा मेल्स’चा फ्रेंच रिमेक आहे. ही कथा चार मध्यमवयीन मित्रांभोवती फिरते जे पॅरिसच्या आधुनिक जगात अनेक समस्यांचा सामना करत आहेत. ही सीरिज २४ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

द सँड कॅसल

‘द सँड कॅसल’ हा एक लेबनीज थ्रिलर चित्रपट आहे. ही कथा एका कठीण परिस्थितीत अडकलेल्या कुटुंबाची गोष्ट आहे. या कुटुंबात चार लोक आहेत. नादिन लाबाकी, झियाद बाकरी, झैन अल रफीया आणि रॅमन अल रफीया यांनी या भूमिका केल्या आहेत. ते चौघेही जगापासून दूर एका वेगळ्या बेटावर अडकतात आणि जगण्यासाठी संघर्ष करतात. तिथे त्यांना अनेक भयंकर रहस्यांचा सामना करावा लागतो. हा चित्रपट २४ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

Story img Loader