ओटीटीवर चित्रपट, सीरिज पाहणाऱ्यांसाठी जून महिना अत्यंत खास असणार आहे. कारण, या आठवड्यात अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट आणि वेब सीरिज डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. यामध्ये रणवीर सिंगचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘धुरंधर २’ पासून ते माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्या ‘मां बहन’ चित्रपटाचा समावेश आहे. म्हणजेच या आठवड्यात घरी बसून तुम्ही अजिबात कंटाळा येणार नाही. १ जून ते ७ जून दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या सर्व नवीन चित्रपटांची आणि सीरिजची संपूर्ण यादी जाणून घेऊया.
धुरंधर: द रिव्हेंज (Dhurandhar: The Revenge)
आदित्य धर दिग्दर्शित हा ब्लॉकबस्टर चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता घरबसल्या पाहता येणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट ४ जूनपासून जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
मां बहन
हा एक क्राईम-कॉमेडी चित्रपट असून तो एका मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबावर आधारित आहे. या कुटुंबात एक सिंगल मदर रेखा (माधुरी दीक्षित) आणि तिच्या दोन भांडखोर मुली जया (तृप्तू डिमरी) आणि सुषमा (धरना दुर्गा) राहतात. त्यांच्या घरात एक मृतदेह सापडल्यानंतर काय घडतं, यावर हा सिनेमा बेतला आहे. हा चित्रपट ४ जूनपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी
Made in India: A Titan Story on OTT: या चरित्रात्मक ड्रामा सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी उद्योगपती जे.आर.डी. टाटा आणि जिम सर्भ यांनी झेरक्स देसाई यांची भूमिका साकारली आहे. ही सीरिज भारतामधील सर्वात यशस्वी स्वदेशी ब्रँड्सपैकी एक असलेल्या ‘टायटन’च्या निर्मितीची कथा दाखवते. ही सीरिज ३ जूनपासून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहता येईल.
गुल्लक सीजन ५
Gullak Season 5 on OTT: या कौटुंबिक कॉमेडी ड्रामाच्या पाचव्या सीजनमध्ये मिश्रा कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. ते आधुनिक काळातील तणाव, नवीन जबाबदाऱ्या आणि घरात हळूहळू होणाऱ्या बदलांचा सामना कसा करतात, हे यात पाहायला मिळेल. ही सीरिज ५ जूनपासून सोनी लिव्हवर स्ट्रीम होईल.
पॅट्रियट
Patriot on OTT: ‘पॅट्रियट’ हा एक राजकीय स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये मल्याळम सुपरस्टार मामूटी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ५ जूनपासून झी ५ वर पाहता येईल.
नॉट सूटेबल फॉर वर्क
Not Suitable for Work on OTT : मॅनहॅटन शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा पाच नोकरदार तरुणांभोवती फिरते. हे पाचही जण ‘मरे हिल’ भागात आपल्या करिअरमधील यश आणि वैयक्तिक आयुष्यातील आनंदासाठी धडपडत आहेत. ही सीरिज २ जूनपासून जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.
ऑफिस रोमान्स
Office Romace on OTT : हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट असून यामध्ये जेनिफर लोपेझ आणि ब्रेट गोल्डस्टीन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. याची कथा जॅकी क्रूझभोवती फिरते, जी एक अत्यंत मेहनती सीईओ आहे. ती तिचा नवीन आणि हुशार कॉर्पोरेट वकील डॅनियल ब्लँचफ्लॉवर याच्या प्रेमात पडते. यावर हा चित्रपट बेतलेला आहे. हा चित्रपट ५ जूनपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
डॉन्ट कॉल इट ए कमबॅक
Don’t Call It a Comeback on OTT : ही एक स्पोर्ट्स डॉक्युमेंट्री सीरिज आहे. प्रसिद्ध स्पोर्ट्स कॉमेंटेटर नोआ ईगल याने होस्ट केलेली ही सीरिज खेळाडू वरील प्रचंड मानसिक दबाव आणि खेळातील महत्त्वाच्या वळणांवर आधारित आहे. ही सीरिज १ जूनपासून जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
केप फियर
Cape Fear on OTT: १० एपिसोड्सची ही सायकॉलॉजिकल थ्रिलर सीरिज एका सुखी वैवाहिक आयुष्य जगणाऱ्या जोडप्याभोवती फिरते. ही सीरिज जॉन डी. मॅकडोनाल्ड यांच्या ‘द एक्झिक्युशनर्स’ या कादंबरीवर आधारित आहे. ही सीरिज ५ जूनपासून ‘ॲपल टीव्ही’वर पाहता येईल.
