Ott Releases this week: दर आठवड्याला हॉलीवूड, बॉलीवूड, दाक्षिणात्य सिनेमे तसेच विविध वेब सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होतात. आता या आठवड्यात म्हणजेच १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या दरम्यान ओटीटीवर काय प्रदर्शित होणार, याबद्दल जाणून घेऊ…

१. वेलकम टू द जंगल

‘वेलकम टू द जंगल’ हा सिनेमा २६ जून २०२६ ला प्रदर्शित झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली. प्रेक्षकांची ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाला चांगली पसंती मिळाली. यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल, अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, रवीना टंडन, लारा दत्ता, तुषार कपूर, जॉनी लिव्हर असे अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले. थिएटरमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता हा सिनेमा जिओ हॉटस्टारवर २१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

२. जन नायकन

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा शेवटचा सिनेमा काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ज्या प्रमाणात सिनेमाची चर्चा होती, तितका सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता हा सिनेमा २१ ऑगस्टला झी ५ या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

३. लॅन्टर्नस (Lanterns)

लॅन्टर्नस ही वेब सीरिज १७ ऑगस्टला जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये जॉन स्टेवर्ट (John Stewart) आणि ग्रीन लँटर्न हॅल जॉर्डन (Green Lantern Hal Jordan) यांची जोडी पाहायला मिळणार आहे.

४. टॉय स्टोरी ५ (Toy Story 5)

पिक्सारच्या लोकप्रिय ‘टॉय स्टोरी’ फ्रँचायझीतील हा पाचवा सिनेमा आहे. ही टीम पुन्हा एकदा नवीन साहसी मोहिमेसाठी तयार झाली आहे. आज म्हणजेच १८ ऑगस्टला हा अॅनिमेटेड सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा प्राइम व्हिडीओ, अॅपल टीव्हीवर पाहता येणार आहे.

५. लव्ह इज ब्लाइंड (Love is Blind)

लव्ह इज ब्लाइंड या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

याबरोबरच ब्लड सॅक्रिफाइज (Blood Sacrifice) हा क्राइम-थ्रिलर सिनेमा २० ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. स्टीलवॉटर (Stillwater) हा सिनेमा २१ ऑगस्टला अॅपल टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे.