OTT Releases This Week: दर आठवड्याला ओटीटीवर नवनवीन सिनेमे, वेब सीरिज प्रदर्शित होतात. विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अनेक जॉनरच्या कलाकृती रिलीज होतात. यामध्ये आधी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांचादेखील समावेश असतो. आता या आठवड्यात म्हणजेच ६ ते १२ जुलैदरम्यान कोणकोणते सिनेमे, वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत, याबद्दल जाणून घेऊ…
पती पत्नी और वो दो
‘पती पत्नी और वो दो’ या चित्रपटाने थिएटरमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना, सारा अली खान, वामिका गब्बी आणि रकुल प्रीत सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १० जुलैपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
पेड्डी
राम चरण आणि जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पेड्डी’ हा सिनेमा ९ जुलैला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध असेल. हा सिनेमा ऑगस्टपासून हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे.
इक्का
सनी देओल आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘इक्का’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या दोन लोकप्रिय कलाकारांना स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. जवळजवळ २९ वर्षांनी हे कलाकार एकत्र दिसणार आहे. हा ओटीटीवरील सर्वाधिक बहुप्रतीक्षित सिनेमांपैकी एक आहे. सिनेमात कोर्टरूम ड्रामा पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा १० जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
‘लँड ऑफ फुटबॉल’ ही डॉक्युमेंटरी १० जुलैला जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ‘परिमला अँड कंपनी’ हा तमिळ सिनेमा १० जुलैला झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. ‘बाल्टी’ हा सिनेमा १० जुलैला सोनी लिव्ह या ओटीटी चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.
‘ट्राइंग’ ही वेब सीरिज ८ जुलैला प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. ‘अंटिल द टी-शर्ट ड्राइज’ ही जपानी सीरिज १० जुलैला नेटफ्लिकवर प्रदर्शित होणार आहे. ‘लिटर हाऊस ऑन द प्रेरी’ ही सीरिज ९ जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
