ओटीटीवर चित्रपट व सीरिज पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी शुक्रवारचा दिवस नेहमीच खास असतो. या शुक्रवारी प्रेक्षकांना मनोरंजनाचा फुल डोस मिळणार आहे. होळीनंतरच्या या वीकेंडला अनेक उत्तम चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. रोमान्सपासून हॉररपर्यंत सर्व जॉनरच्या कलाकृती ओटीटीवर पाहायला मिळतील. जर तुम्हालाही वीकेंडला घरी ओटीटीवर काहीतरी छान पाहायचं असेल तर या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि सीरिजची यादी पाहून घ्या.

चिरैया (Chiraiya)

दिव्या दत्ताचा ‘चिरैया’ हा चित्रपट एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करतो. समाजात ज्या मुद्द्यांवर सहसा कोणी बोलायला धजावत नाही, अशा प्रश्नांना हा चित्रपट वाचा फोडतो. चित्रपटाची कथा कन्सेंट, वैवाहिक बलात्कार आणि सामाजिक मौन यावर आधारित आहे. दिव्या दत्ता यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट आज ६ मार्चला जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

द राजा साहब (हिंदी)

The Raja Saab on Jio Hotstar : प्रभासच्या ‘द राजा साहब’ या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन ओटीटीवर येण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात संजय दत्तने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.

Award Banner

गांधी टॉक्स

Gandhi Talks on OTT : ‘गांधी टॉक्स’ हा चित्रपट झी5 प्रदर्शित होत आहे. विजय सेथुपती आणि अदिती राव हैदरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट भ्रष्टाचारावर आधारित आहे.

टेड सीझन २ (Ted Season 2)

‘टेड’चा दुसरा सीझन या शुक्रवारी ओटीटीवर येत आहे. याच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे आता दुसऱ्या सीझनसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या सीझनमध्ये जॉन बेनेट आणि त्याच्या खोडकर टेडी बेअरची कथा पुढे सरकेल. ज्यांनी पहिला सीझन पाहिला आहे, ते या शुक्रवारची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही सीरिज तुम्ही जिओ हॉटस्टारवर घरबसल्या पाहू शकता.

विक्रम ऑन ड्यूटी

जिओ हॉटस्टारवरील लोकप्रिय सीरिज विक्रम ऑन ड्युटी ही एक क्राईम थ्रिलर वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये नियम मोडणाऱ्या एका इन्स्पेक्टरची कथा सांगण्यात आली आहे. गुन्हेगारांचे नेटवर्क तो कशा प्रकारे उद्ध्वस्त करतो, हे यात पाहायला मिळतं.

वॉर मीशन

ही एक सायन्स-फिक्शन मिलिट्री ॲक्शन-थ्रिलर सीरिज आहे. यामध्ये एक साधे ट्रेनिंग मिशन अचानक रोबोटिक संकटांविरुद्धच्या युद्धात कसे बदलते, हे दाखवण्यात आलंय. तुम्ही ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहू शकता.