OTT New Releases April 2026: जर तुम्ही या विकेंडला घरबसल्या मनोरंजनाचा प्लॅन करत असाल, तर ओटीटीवर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ३ एप्रिल रोजी नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ आणि झी५ वर एकाच वेळी अनेक मोठे चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा सस्पेन्स थ्रिलर ‘वध २’ आणि वकिली विश्वातील विनोदी सीरिज ‘मामला लीगल है २’ यांचा समावेश आहे. तसेच, मोना सिंह हिची आगळीवेगळी कथा असलेली ‘मा का सम’ ही सीरिजदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

१. ब्लडहाउंड्स सीझन २ (Bloodhounds Season 2)

‘ब्लडहाउंड्स’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात वू डो-ह्वान आणि ली सांग-यी मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज ३ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

२. वध २ (Vadh 2)

नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘वध २’ आता ओटीटीवर येत आहे. शिवपुरी जिल्हा कारागृहातून एका स्थानिक आमदाराचा भाऊ आणि गुन्हेगार ‘केशव’ हा रहस्यमयीरीत्या बेपत्ता होतो, याभोवती चित्रपटाची कथा फिरते. हा चित्रपट ३ एप्रिलला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

Award Banner

३. भाभी जी घर पर हैं: फन द रन

चित्रपटगृहात फ्लॉप ठरलेला ‘भाभी जी घर पर हैं: फन द रन’ हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होत आहे. हा चित्रपट ३ एप्रिल रोजी झी५ (ZEE5) वर प्रदर्शित होईल.

४. मामला लीगल है सीझन २ (Maamla Legal Hai Season 2)

पटपडगंज जिल्हा न्यायालयातील वकील आणि त्यांच्या अजब केसेस पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला तयार आहेत. यावेळी रवी किशन (व्ही.डी. त्यागी) वकिली सोडून ‘जज’च्या भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजचा पहिला सीझन खूप गाजला होता. दुसरा सीझन ३ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

५. मा का सम (Ma Ka Sum)

मोना सिंह आणि मिहीर आहुजा यांच्या मुख्य भूमिका असलेली ही सीरिज एका १९ वर्षांच्या गणितज्ज्ञ मुलाच्या कथेवर आधारित आहे. गणिताची आवड असलेल्या अगस्त्यला वाटतं की प्रत्येक मानवी समस्या एका अल्गोरिदमने सोडवता येते, अगदी त्याच्या अविवाहित आईची लव्ह लाइफसुद्धा. यामध्ये अगस्त्यच्या भूमिकेत मिहिर आहुजा आहे. जो त्याची आई विनिता (मोना सिंह) हिच्यासाठी योग्य जोडीदार शोधण्याकरिता ‘प्रोजेक्ट मॉम’ सुरू करतो. यात अंगिरा धर आणि रणवीर ब्रार यांच्याही भूमिका आहेत. ही सीरिज ३ एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.

६. हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस

२०२६ मध्ये प्रदर्शित झालेला हा एक ‘स्पाय-कॉमेडी’ चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन वीर दास याने केले आहे. हा चित्रपट १ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यात ॲक्शनसोबतच विनोदाचा जबरदस्त तडका पाहायला मिळेल.

७. मृत्युंजय (Mrityunjay)

६ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला ‘मृत्युंजय’ हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आता ओटीटीवर येत आहे. श्री विष्णू याची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ३ एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

८. सितारे जमीन पर (Sitare Zameen Par)

आमिर खान आणि जेनेलिया डिसूझा यांचा २०२५ मधील गाजलेला कॉमेडी-ड्रामा चित्रपट ‘सितारे जमीन पर’ आता ओटीटीवर रिलीज होत आहे. आर. एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ३ एप्रिलपासून सोनी लिव्हवर उपलब्ध होईल.