Ott Release This Week: ओटीटी माध्यमांमुळे घरबसल्या मनोरंजन होते. विशेष म्हणजे दर आठवड्याला नवनवीन वेब सीरिज, चित्रपट, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी प्रदर्शित होत असतात, त्यामुळे या आठवड्यात कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय प्रदर्शित होणार याबद्दल जाणून घेऊ…
१. कॉकटेल २
शाहिद कपूर, क्रिती सेनॉन आणि रश्मिका मंदाना हे तीन लोकप्रिय कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार कमाल करू शकला नाही. आता ओटीटीवर सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. १४ ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
२. भारत भाग्य विधाता
कंगना रणौत यांची प्रमुख भूमिका असलेला ‘भारत भाग्य विधाता’ हा सिनेमा झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. १४ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सिनेमात गिरिजा ओकचीही महत्त्वाची भूमिका आहे. मनोज तापडिया यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
३. आखिरी सवाल
‘आखिरी सवाल’ या सिनेमात संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकेत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. हा सिनेमा Lionsgate Play वर १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
४. अरूपी
‘अरूपी’ हा मल्याळम सिनेमा आहे. हा हॉरर थ्रिलर सिनेमा आहे. हा सिनेमा १४ ऑगस्टला Lionsgate Play वर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी भाषेतही पाहता येणार आहे.
रीचर या वेब सीरिजचा चौथा सीझन प्रदर्शित होणार आहे. १२ ऑगस्टला प्राइम व्हिडीओवर ही वेब सीरिज पाहता येईल. ‘माय ब्रिलियंट करिअर’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर १३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे, तर ‘धिस’, ‘दॅट अँड एव्हरीथिंग इन बिटवीन’ हा सिनेमा १३ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर ‘डोन्ट से गुड लक’ (Dont Say Good Luck) हा कॉमेडी सिनेमा आहे; हा सिनेमा १४ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. My Best Friend, His Girlfriend and Me ही जर्मन कॉमेडी फिल्म आहे. लहानपणीच्या दोन मित्रांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा १४ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच, Umthetho ही वेब सीरिज १४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
