OTT Releases This Week : सिनेप्रेमींसाठी हा वीकेंड अत्यंत खास ठरणार आहे. २८ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि थिएटरमध्ये अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट व सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. नेटफ्लिक्सवर ‘चुंबक’ आणि ‘द व्हिस्पर मॅन’, झी५ वर बॉबी देओलचा ‘बंदर’, तर जिओ हॉटस्टारवर ‘पार्ट टायमर्स’ आणि शनिवारी २९ ऑगस्टला ‘मायकल’ जॅक्सनचा बायोपिक स्ट्रीम होणार आहे. याशिवाय अनुपम खेर यांचा ‘खोसला का घोसला २’ ओटीटीवर दाखल झाला आहे. या लाँग वीकेंडला घरबसल्या मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी या सर्व नवीन रिलीजची संपूर्ण यादी नक्की पाहा.

चुंबक

Chumbak on OTT: चुंबक ही सीरिज एकाच छताखाली राहणाऱ्या पाच वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांची कथा सांगते. मुलांचे संगोपन, लग्न आणि म्हातारपण या रोजच्या आयुष्यातील चढ-उतारांमध्ये, हसू आणि भावना त्यांच्या अनुभवांना एक नवीन रूप देतात आणि हळूहळू त्यांना एकमेकांच्या जवळ आणून एका ‘सरोगेट कुटुंबात’ बदलतात. आज २८ ऑगस्टला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली.

पार्ट टायमर्स

Part-Timers on OTT: सिंधू आणि तेजा या दोन रूममेट्सच्या आयुष्यावर आधारित हा तेलगू ड्रामा चित्रपट आहे. वेगळा स्वभाव आणि पार्श्वभूमी असूनही त्यांच्यात एक मैत्री निर्माण होते. एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे असल्याने त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, पण त्यांच्या नवीन ‘स्टार्टअप’चे स्वप्न त्यांना कसे एकत्र ठेवते, यावर ही कथा बेतलेली आहे. आज २८ ऑगस्टला ही सीरिज जिओ हॉटस्टारवर रिलीज झाली.

बंदर

Bandar on OTT : अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘बंदर’ हा चित्रपट आज झी5 वर रिलीज झालाय. यात बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहे, जो एका टीव्ही सुपरस्टारची भूमिका साकारत आहे. करिअरच्या उतरत्या काळात त्याची एक्स गर्लफ्रेंड त्याला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवते.

द व्हिस्पर मॅन

The Whisper Man on Netflix : या चित्रपटाची कथा क्राइम रायटर टॉम केनेडी (ॲडम स्कॉट) याच्याभोवती फिरते, त्याच्या आठ वर्षांच्या मुलाचे अपहरण होते. तो आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी त्याचे माजी पोलीस अधिकारी असलेले वडील आणि डीआय अमांडा यांची मदत घेतो.

बबीता सिंह रिपोर्टिंग

Babita Singh Reporting on OTT: बबीता बेबी सिंह ही एक नवीन पोलीस अधिकारी आहे. तिच्या लहानपणीच्या मित्राचा खून होतो आणि तिच्या आयुष्याला नाट्यमय वळण मिळते. त्यानंतर ती स्वतः प्रकरणाचा शोध घ्यायचं ठरवते. ही सीरिज आज प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली आहे.

ग्रेव्हयार्ड सीझन ३

Graveyard Season 3 on OTT: तुर्किश शो ‘ग्रेव्हयार्ड’ त्याच्या धमाकेदार तिसऱ्या सीझनसह परतला आहे. यामध्ये इन्स्पेक्टर ओनेम ओजुल्कु तिच्या जुन्या स्पेशल युनिटसोबत एक नवीन आणि कठीण केस सोडवताना दिसतो. ही सीरिज आज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली.

ऑल द ट्रुथ इन माय लाइज

All the Truth in My Lies on Netflix : एका गाजलेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. यात सहा अविवाहित मित्रांची गोष्ट सांगण्यात आली आहे. सर्वजण एकत्र फिरायला जातात. मात्र, प्रवासादरम्यान त्यांची जुनी गुपितं येतात, ती गुपितं त्यांच्यासाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखी ठरतात. ऑल द ट्रुथ इन माय लाइज हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

मायकल

Michael Jackson : ‘किंग ऑफ पॉप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायकल जॅक्सनचा बायोपिक ९ जून २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता. वादात सापडूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता हा चित्रपट OTT वर रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट शुक्रवारी नाही, तर शनिवारी २९ ऑगस्टला जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

खोसला का घोसला 2

अनुपम खेर यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘खोसला का घोसला २’ हा देखील आज, २८ ऑगस्टला ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्याबरोबर बोमन इराणी आणि रवी किशन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.