OTT Releases This Week : जागतीक स्तरावर जसे वेगवेगळे सीरिज व चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य व इतर प्रादेशिक भाषांतील सीरिज व चित्रपटसुद्धा आपल्या भेटीला आले आहेत. या आठवड्यात कोणत्या मालिका व चित्रपट प्रदर्शित होत आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात…
प्रेमकहाणी, थ्रिलर, क्राईम व ग्रामीण बाज असलेल्या कलाकृती या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेते विजय सेतुपती ते मिथुन चक्रवर्ती या कलाकारांच्या सीरिजचा समावेश आहे. बंगाली, गुजराती, तमीळ वतेलुगू यांसारख्या भाषेतील सीरिज व चित्रपट या आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत.
या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘या’ कलाकृती
Faati Ne? – धाडसी विषयावर आधारित हा एक बोल्ड गुजराती सिनेमा आहे. फैसल हाश्मी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा मेलबर्न येथील दोन पोलिस अधिकारी परमलाल व पदमलाल यांच्या अवतीभोवती फिरते. २७ मार्चपासून ही सीरिज शेमारोवर पाहता येणार आहे.
Kaattaan — काट्टान ही एक तमीळ मिस्ट्री क्राईम सीरिज आहे. त्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेते विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत; तर मिलिंद सोमणसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. २७ मार्चपासून जिओ हॉटस्टारवर ही सीरिज रीलीज होणार आहे.
नांगल – नांगल हा एक भावनिक चित्रपट असून, तो चरित्रपटासारखा आहे. उटीच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रपटाचं शूटिंग झालं आहे. या चित्रपटाची कथा तीन भावांच्या नजरेतून पाहायला मिळते. हा चित्रपट २७ मार्चपासून सन एनएक्सटीवर प्रदर्शित होणार आहे.
प्रोजापती २ – बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा हा बंगाली चित्रपट आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. त्यामध्ये एकल पालकत्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे. एक वडील त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना दिसतात. हा चित्रपट २७ मार्च रोजी झी ५वर रिलीज होणार आहे.
संप्रदायिनी सुप्पिनी सुद्धापुसानी – हा एक तेलुगू क्राईम कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील राजकारण पाहायला मिळतं. हा चित्रपट २६ मार्चपासून ईटीव्हीवर प्रदर्शित होत आहे.
दरम्यान, या आठवड्यात ओटीटीवर या विविध सीरिजसह व चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे. २६ ते २७ मार्च या दिवसांत या कलाकृती प्रदर्शित होणार आहेत. झी ५, जिओ हॉटस्टार आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ते पाहायला मिळणार आहेत.
