OTT Releases This Week: सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा मोठा धमाका होणार आहे. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, जिओहॉटस्टार आणि झी५ सारख्या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १० नवे धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज रिलीजसाठी सज्ज आहेत. यामध्ये परिणीती चोप्रा आणि जेनिफर विंगेटचा ‘शक: ट्रस्ट नो वन’, आलिया भट्ट निर्मित ‘डोंट बी शाय’, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ५’ आणि वीरेंद्र सहवागचा ‘राइज अँड फॉल सीझन २’ यांसारख्या बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट्सचा समावेश आहे. चित्रपट आणि सीरिजच्या शौकिनांसाठी हा आठवडा अतिशय खास ठरणार आहे.

१. शक: ट्रस्ट नो वन

परिणीती चोप्रा आणि जेनिफर विंगेटचा शक: ट्रस्ट नो वन हा क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. यात ९ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध घेणाऱ्या एका आईची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट २४ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

२. हुंकार – द रोर

हा एक क्राइम-कोर्टरूम थ्रिलर चित्रपट आहे. यात १७ वर्षांची मुलगी एका प्रभावशाली आध्यात्मिक गुरूवर लैंगिक शोषणाचा आरोप करते. हा चित्रपट २५ सप्टेंबरपासून जिओहॉटस्टारवर पाहता येईल.

३. अगाधा

ही एका आध्यात्मिक शक्ती असलेल्या महिलेची कथा आहे. आपल्या कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठी तिला एका भयानक शक्तीशी संघर्ष करावा लागतो. हा चित्रपट २५ सप्टेंबरपासून झी ५ वर पाहता येईल.

४. डोंट बी शाय

आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात श्यामिली दास या २० वर्षांच्या कॉलेज तरुणीची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट २५ सप्टेंबरला प्राइम व्हिडीओवर रिलीज होईल.

५. राइज अँड फॉल सीझन २

वीरेंद्र सहवाग होस्ट करत असलेला राइज अँड फॉल सीझन २ हा रिॲलिटी शो २६ सप्टेंबरला प्राइम व्हिडीओवर रिलीज होईल. यात १५ स्पर्धक सहभागी होणार आहेत.

६. बकैती सीझन २

राजेश तेलंग आणि शीबा चड्ढा यांची मुख्य भूमिका असलेली ही सीरिज कटारिया कुटुंबातील नवीन आव्हानं आणि बदलते कौटुंबिक नातेसंबंध यावर आधारित आहे. ही सीरिज २५ सप्टेंबरपासून झी५ वर पाहता येईल.

७. द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ५

कपिल शर्मा आणि त्याची टीम प्रेक्षकांना हसवण्यासाठी पुन्हा एकदा नवीन सीझन घेऊन येत आहे. द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ५ २६ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

८. ब्लड लेगेसी सीझन २

ब्लड लेगेसी सीझन २ हा ड्रामा शो २५ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.

९. अंगिकारम

ही एक तमिळ स्पोर्ट्स-कोर्टरूम ड्रामा फिल्म आहे. खेळाडूंच्या मैदानाबाहेरील वैयक्तिक संघर्षावर यात प्रकाश टाकण्यात आला आहे. ही सीरिज तुम्हाला सन एनएक्सटीवर २५ सप्टेंबरपासून पाहता येईल.

१०. द फायनल प्रॉब्लेम

ही एक स्पॅनिश मिस्ट्री थ्रिलर सीरिज आहे. वादळामुळे एका हॉटेलमध्ये अडकलेल्या १३ लोकांच्या भोवती याची कथा फिरते. ही सीरिज तुम्ही २५ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहू शकता.