OTT Releases This Week: जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांना अनेक चित्रपट व सीरिज ओटीटीवर पाहता येणार आहेत. या आठवड्यात हॉलीवूड, बॉलीवूड आणि अनेक उत्तम वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत, ज्या तुम्ही घरबसल्या सहज पाहू शकता. या आठवड्यात कोणते चित्रपट आणि सीरिज डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार, त्याची यादी जाणून घेऊयात.

शार्क टँक इंडिया 4

Shark Tank India 4 : तीन सीझन यशस्वी झाल्यानंतर आता शार्क टँक इंडियाचा चौथा सीझन ६ जानेवारीपासून सुरू झाला आहे. यात प्रेक्षकांना अमन गुप्ता आणि अनुपम मित्तल यांच्यासोबत ‘शार्क’ पॅनलमध्ये अनेक नवीन शार्क दिसतील. प्रेक्षकांना हा शो सोनी लिव्ह या डिजिटल प्लॅटफॉर्मवर रात्री ८ वाजता पाहता येईल.

rbi rate cuts news in marathi
Market Week Ahead: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता लक्ष रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य व्याजदर कपातीकडे
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Share Market Budget 2025
India Budget 2025 Updates : तुमच्याकडेही आहेत का हे शेअर्स? अर्थसंकल्प जाहीर होताच झोमॅटोसह ‘या’ स्टॉक्समध्ये तेजी
Union Budget 2025 nirmala sitharaman sensex
Union Budget 2025 Highlights : “देशावर ६० वर्षे राज्य करूनही, काँग्रेस ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर सवलत…”, काँग्रेसच्या टीकेवर भाजपाचा पलटवार
OTT Release In February first week
या वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं? वाचा वेब सीरिज व चित्रपटांची यादी!
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?
Weekly Horoscope 27January To 2 Febuary 2025
Weekly Horoscope 27January To 2 February 2025: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ‘या’ ६ राशींचे उजळणार भाग्य! मिळणार चांगली बातमी, १२ राशींचे साप्ताहिक राशिभविष्य
Five important developments in stock market in week of Union Budget
Market Week Ahead: केंद्रीय अर्थसंकल्पाचे वेध लागलेल्या आठवड्यात शेअर बाजारातील या पाच घडामोडी महत्त्वपूर्ण

हेही वाचा – विवियन डिसेनाच्या घटस्फोटाबद्दल पत्नीचं वक्तव्य; त्याच्या पहिल्या बायकोबाबत नूरन म्हणाली…

ब्लॅक वॉरंट

Black Warrant on OTT: ‘ब्लॅक वॉरंट’ ही एक नवीन सीरिज आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमध्ये जहान कपूर दिसणार आहे. तसेच राहुल भट्ट, परमवीर सिंग चीमा, अनुराग ठाकूर, सिद्धांत गुप्ता आणि राजश्री देशपांडे असे कलाकार यात आहेत. विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ही सीरिज १० जानेवारीपासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”

द साबरमती रिपोर्ट

The Sabarmati Report : विक्रांत मॅसी स्टारर चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गोध्रा घटनेची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता हा चित्रपट 10 जानेवारी रोजी झी5 वर ओटीटीवर रिलीज होणार आहे.

अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”

गूजबंप्स: द व्हॅनिशिंग

Goosebumps: The Vanishing on OTT: डेव्हिड श्विमरची ही हॉरर सीरिज त्याच्या दुसऱ्या भागासह परत येणार आहे. ही अँथनी ब्रुअरवर आधारित आहे, जे वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ही सीरिज १० जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

ॲड विटम

Ad Vitam on OTT : गिलौम कॅनेट, स्टीफन कॅलार्ड आणि नासिम लायस यांच्या भूमिका असलेला हा थ्रिलर शो तुम्हाला घरबसल्या पाहता येईल. हा शो १० जानेवारीपासून लोकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

Story img Loader