Best ZEE5 Web Series & Movies with high IMDb ratings : जर तुम्ही घरी बसून कंटाळला असाल आणि ओटीटीवर चांगला कंटेंट शोधत असाल, तर झी ५वरील काही कलाकृती तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. सध्या या प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ट्रेंड होत आहेत, ज्यामध्ये भावनिक, कॉमेडी, मिस्ट्री, सस्पेन्स आणि थ्रिलरचा समावेश आहे.
या सीरिज तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. शिवाय IMDb वरही त्यांना चांगली रेटिंग मिळाली आहे. चला तर मग, या यादीत कोणत्या कलाकृतींचा समावेश आहे याबद्दल जाणून घेऊयात…
घरबसल्या झी ५वर पाहा ‘या’ सीरिज व चित्रपट
Sirf Ek Bandaa Kaafi Hai – हा एक दमदार कोर्टरूम ड्रामा आहे, ज्यामध्ये एक सामान्य वकील मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध केस लढताना दिसतो. ही कथा न्याय आणि धैर्याचं उत्तम उदाहरण मांडते. या चित्रपटात मनोज बाजपेयी यांच्या अभिनयाने नेहमीप्रमाणे वेगळीच छाप सोडली आहे. IMDbवर या चित्रपटाला ७.९ इतकं रेटिंग मिळालं आहे.
TVF Pitchers – ही सीरिज चार मित्रांच्या आयुष्यावर आधारित आहे, जे आपली नोकरी सोडून स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतात. या सीरिजमध्ये मैत्री, संघर्ष आणि मोठी स्वप्नं पाहण्याची धडपड पाहायला मिळते. हलकी-फुलकी कॉमेडी आणि वास्तवदर्शी कथा यामुळे ही सीरिज तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. IMDb वर या सीरिजला ९.१ रेटिंग मिळालं आहे.
Mukhbir – The Story of a Spy – ही १९६५ च्या काळावर आधारित एक स्पाय थ्रिलर सीरिज आहे. IMDbवर या सीरिजला ७.६ रेटिंग मिळालं आहे. या कथेत एका सामान्य माणसाला गुप्तहेर बनवून शत्रूराष्ट्रात पाठवलं जातं. देशभक्ती आणि सस्पेन्स यांचा उत्तम संगम या सीरिजमध्ये पाहायला मिळतो.
Abhay – ही IMDbवर ८ रेटिंग मिळालेली क्राइम थ्रिलर सीरिज आहे. ही सीरिज काही सत्य घटनांवर आधारित असल्याचं सांगितलं जातं. या कथेत एक पोलिस अधिकारी गुन्हेगारी प्रकरणं सोडवताना दिसतो. प्रत्येक भागात नवं प्रकरण आणि अनपेक्षित ट्विस्ट असल्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतात.
Sunflower – ही एक मर्डर मिस्ट्री सीरिज आहे. एका सोसायटीत झालेल्या खुनानंतर संशय एका विचित्र स्वभावाच्या तरुणावर जातो. या कथेत सस्पेन्सबरोबर हलकी-फुलकी कॉमेडीही पाहायला मिळते, त्यामुळे ही सीरिज वेगळी ठरते. IMDbवर या सीरिजला ७.४ रेटिंग मिळालं आहे.
Ayali – आयली या सीरिजमध्ये एका गावातील मुलीची कथा दाखवण्यात आली आहे, जिचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न असतं. मात्र, समाजातील काही परंपरा आणि रुढी तिच्या मार्गात अडथळा ठरतात. महिलांचा संघर्ष, जिद्द आणि स्वप्नांसाठीची लढाई या सीरिजमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहे. IMDbवर या सीरिजला ८.५ रेटिंग मिळालं आहे.
Tripling – ही सीरिज तीन भावंडांच्या आयुष्याभोवती फिरते, जे आपआपल्या अडचणींशी झुंज देत असतात. एकत्र प्रवासाला निघाल्यानंतर त्यांचं नातं आणखी घट्ट होत जातं. भावंडांमधील प्रेम, भांडणं आणि भावनिक क्षण या सीरिजमध्ये सुंदरपणे दाखवण्यात आले आहेत. IMDbवर या सीरिजला ८.५ रेटिंग मिळालं आहे.
