बहुप्रतिक्षीत ‘पंचायत ३’ वेब सीरिज २८ मे रोजी प्रदर्शित झाली. गेले दोन आठवडे सातत्याने याच वेब सीरिजची चर्चा होत आहे. फुलेरा गावची कथा आणि यातील कलाकारांबद्दल सोशल मीडियावर खूप बोललं जात आहे. या पर्वात एक नवीन पात्र पाहायला मिळालं, ते म्हणजे अम्माजी! सरकारी योजनेतून घर मिळावं यासाठी ज्याप्रकारे अम्माजी अभिनय करतात, ते पाहून अनेकांनी टाळ्या वाजवल्या. अम्माजीचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री आभा शर्मा यांच्याबद्दल आज जाणून घेऊयात.

आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या लाडक्या ठरलेल्या आभा शर्मा यांनी ५४ व्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना नेहमीच अभिनय करायचा होता, पण काही कारणाने ते होऊ शकलं नाही. आभा शर्मा या कवी आणि विचारवंत रामविलास शर्मा यांची पुतणी आहेत.

movies on OTT
ॲक्शन, सस्पेन्स अन् ड्रामा चित्रपट आवडत असतील, तर नक्की वाचा ‘ही’ यादी, सर्व सिनेमे ओटीटीवर येणार पाहता!
films web series released on OTT this week
वीकेंडचा प्लॅन ठरत नाहीये? मग घरीच पाहा ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज, याच आठवड्यात प्रदर्शित झाल्यात कलाकृती
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
Amala Paul blessed with baby boy
Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ
rasika duggal on intimate scenes in Mirzapur 3
‘मिर्झापूर’ मधील इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री रसिका दुग्गल म्हणाली, “रिहर्सलच्या वेळीच मला जाणवलं की…”
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”

IIT मधून शिकलेला जितेंद्र कुमार कसा झाला ‘पंचायत’चा सचिव? फिल्मी आहे त्याची अभिनेता होण्याची गोष्ट

‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत ७५ वर्षांच्या आभा शर्मांनी त्यांचा प्रवास सांगितला. “मला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. पण, माझ्या आईला हे मान्य नव्हतं. तिला हे प्रोफेशन आवडत नव्हतं आणि मला तिच्या इच्छेविरुद्ध जायचं नव्हतं. माझं कुटुंब सुशिक्षित असलं तरी ते थोडं सनातनी होतं. माझ्या आईच्या निधनानंतर मी पुन्हा एकदा अभिनयाकडे वळले आणि यावेळी मला माझ्या भावंडांचा पाठिंबा होता,” असं आभा शर्मा म्हणाल्या.

निर्मात्यांबरोबर भांडण अन् ‘पंचायत’ सीरिज सोडण्याबद्दल जितेंद्र कुमार म्हणाला, “एक वेळ अशी आली की…”

आभा कुटुंबात सर्वात लहान होत्या. त्यांना एक मोठी बहीण आणि भाऊ होते, त्यांचे आता निधन झाले आहे. त्यांची कुटुंबे दिल्ली आणि हैदराबादमध्ये स्थायिक आहेत. दूरसंचार कंपनीत काम करणाऱ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आभा शर्मा आपल्या आजारी आईची काळजी घेत होत्या. यामुळेच त्यांनी लग्नही केलं नाही. त्यांच्या मनात नेहमीच कलाकार व्हायची इच्छा होती. त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून डिप्लोमा पदवी मिळवल्यानंतर १९७९ मध्ये शाळेत शिकवणं सुरू केलं.

त्यांचं आयुष्य सोपं राहिलं नाही. वयाच्या ३५ व्या वर्षी हिरड्यांमध्ये संसर्ग झाल्यामुळे त्यांनी आपले सर्व दात गमावले. पण तरीही त्या नोकरी करत राहिल्या. मग ४५ व्या वर्षी त्यांना आणखी एक दुर्मिळ आजार जडला, ज्यामुळे त्यांचे हातपाय थरथर कापत होते.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”

१९९१ मध्ये त्यांनी शाळेत शिकवणं सोडलं. २००८ मध्ये आभा यांनी लखनऊमध्ये थिएटर करण्यास सुरुवात केली. हे त्यांनी आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी उचललेलं पाऊल होतं, पण त्या फारशा नाटकांमध्ये भाग घेऊ शकल्या नाही. नंतर बँक ऑफ बरोडाच्या एका जाहिरातीतून त्यांच्या मुंबईतील अभिनय करिअरला सुरुवात झाली. मात्र प्रकृतींच्या कारणास्तव त्यांनी ‘पिपली लाइव्ह’ व इतर काही सिनेमांच्या ऑफर सोडल्या.

करोनानंतर आभा थिएटरमध्ये अनुराग शुक्ला शिवा नावाच्या व्यक्तीला भेटल्या. अनुराग लखनऊमध्ये त्यांचे भाडेकरू आहेत. त्यांनी आभा यांना पंचायतमधील भूमिकेसाठी ऑडिशन व्हिडीओ बनवण्यास सांगितलं आणि त्यांना ही भूमिका मिळाली. १० दिवस पंचायतच्या सेटवर काम करणाऱ्या आभा शर्मांनी त्यांचा अनुभव सांगितला. “मी सीरिजबद्दल थोडी साशंक होते, पण सेटवर पोहोचल्यानंतर सगळ्या शंका दूर झाल्या. सर्व सहकलाकार, दिग्दर्शक, मेकअपमन सर्वांनी खूप मदत केली,” असं त्या म्हणाल्या.

बॉयफ्रेंडपेक्षा वयाने मोठी आहे सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री ३७ वर्षांची तर झहीर इक्बालचं वय…

आपलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ५४ वर्षे वाट पाहणाऱ्या आभा शर्मा तरुण पिढीला एक महत्त्वाचा संदेश देतात. “तुम्हाला कोणत्याही गोष्टीची, अगदी थोडीशीही आवड असेल, तर त्यासाठी प्रयत्न करा. ती आवड सोडू नका. देव प्रत्येक कलाकाराला ज्या प्रकारे मदत करतो तशी तुम्हालाही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेल,” असं त्या म्हणतात.

आभा शर्मा यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्या ‘दुर्गा प्रसाद की दुसरी शादी’ या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय आणखी एका चित्रपटात त्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.