मनोज बाजपेयींची ‘फॅमिली मॅन’ असो वा जितेंद्र कुमारची ‘पंचायत’. अशा अनेक वेब सीरिज आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. या सीरिजचे पहिले भाग खूप लोकप्रिय झाले आणि नंतर त्याचे सिक्वेल आले. काहींचे तर त्याहून जास्त सीझन आले. या शोची लोकप्रियता इतकी आहे की निर्मातेही त्याचे पुढचे भाग आणत आहेत. आता लवकरच अनेक लोकप्रिय सीरिजचे पुढचे सीझन प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. कोणत्या आहेत या सीरिज, पाहा यादी.

मिर्झापूर ३

पंकज त्रिपाठी व अली फजल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मिर्झापूरचे आतापर्यंत दोन सीझन रिलीज झाले आहेत. दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. त्यानंतर आता तिसरे सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या तिसऱ्या सीझनचं शूटिंग पूर्ण झालंय, पण त्याच्या रिलीजच्या तारखेची घोषणा अद्याप झालेली नाही. मिर्झापूर ३ जून किंवा जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे.

india Post scam
भारतीय पोस्ट खात्याच्या नावे लोकांची आर्थिक फसवणूक; काय आहे हा घोटाळा? कशी टाळता येईल फसवणूक?
talibani rules afghanistan
संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि महिलांच्या सजण्यावरही बंदी; अफगाणिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?
Organ Transplant Racket
दिल्लीत अवयव प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश! एका डॉक्टरसह ७ जणांना अटक, मुख्य सूत्रधार बांगलादेशी
wedding card, environmental conservation,
अंबानींची लग्नपत्रिका असेल वेगळी, पण चर्चा मात्र ‘या’ लग्नपत्रिकेचीच
Loksatta viva Love poem of the first rain messenger
पहिल्या पावसाचं प्रेमकाव्य : मेघदूत
FYJC Admission Will Maratha Reservation Apply
अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर; FYJC प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार का? शिक्षण संचालकांचे उत्तर वाचा
loksatta kutuhal beethoven last symphony finished with the help of artificial intelligence
कुतूहल : बीथोवनची सिंफनी
live-in relationship,
लिव्ह-इन नात्याची वैधता आणि वारसाहक्क…

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

असुर ३

या सुपरहिट सायकोलॉजिकल ड्रामामध्ये अरशद वारसी, बरुण सोबती, अनुप्रिया गोएंका, रिद्धी डोगरा व शारिब हाश्मी झळकले होते. या सीरिजचा तिसरा भाग लवकरच येईल असं म्हटलं जातंय.

दिल्ली क्राइम ३

या सीरिजच्या पहिल्या भागात सामुहिक बलात्कार झालेल्या तरुणीची कहाणी दाखवण्यात आली होती, दुसऱ्या भागात खूनाची कहाणी दाखवण्यात आली होती. आता लवकरच या सीरिजचा तिसरा भाग येणार आहे.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

फॅमिली मॅन सीझन ३

फॅमिली मॅन ही एक स्पाय थ्रिलर वेब सीरीज आहे. जी राज व डीके यांचं क्रिएशन असलेली ही सीरिज प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. यात मनोज बायपेयी, प्रियमणी, शरद केळकर, नीरज माधव, शारीब हाश्मी, दलीप ताहिल आणि सनी हिंदुजा सारखे कलाकार होते. दुसऱ्या पर्वात यात समांथा रुथ प्रभू होती. आता लवकरच या सीरिजचा तिसरा सीझन प्रदर्शित होणार आहे.

आश्रम ४

बॉबी देओलच्या क्राइम ड्रामा सीरिजचे तीन सीझन आतापर्यंत आले आहेत. या लोकप्रिय सीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा आहेत. एमएक्स प्लेअरवर ही सीरिज उलब्ध आहे. बॉबी देओल, अदिती पोहनकर, दर्शन कुमार, अनुप्रिया गोएंका आणि ईशा गुप्ता या कलाकारांची मांदियाळी असलेल्या सीरिजचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

पंचायत ३

हे व्हायरल फिव्हर निर्मित ‘पंचायत ३’ प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. यात जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता आणि सान्विका यांच्या भूमिका आहेत. या सीरिजचे दोन सीझन आले असून तिसरा सीझन २८ मे रोजी रिलीज होणार आहे.

फर्जी २

शाहिद कपूरच्या या थ्रिलर सीरिजचा पहिला भाग प्रेक्षकांना खूप आवडला होता. या मालिकेत शाहिद व्यतिरिक्त विजय सेतुपती, केके मेनन, राशी खन्ना आणि भुवन अरोरा यांच्या भूमिका होत्या. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचं शूटिंग सुरू झालं आहे आणि ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.