Panchayat 4 Online Leak: अमेझॉन प्राइमची सुपरहिट सीरिज ‘पंचायत 4’ (Panchayat Season 4) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. २३ जूनला रात्री १२ वाजता ‘पंचायत’चा चौथा सीझन रिलीज झाला. प्रेक्षक मागील अनेक दिवसांपासून चौथ्या सीझनची वाट पाहत होते. सीरिज पाहिल्यानंतर लोक उत्साहाने त्याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. पण ‘पंचायत 4’च्या निर्मात्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

‘पंचायत 4’ रिलीज होताच ऑनलाइन लीक झाली आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स ‘पंचायत 4’ बद्दल पोस्ट करत आहेत. अनेकांनी या सीझनचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी हा सीझन मोफत डाउनलोड करून पाहण्यासाठी लिंक्स शेअर केल्या आहेत.

‘पंचायत 4’ च्या रिव्ह्यूबरोबरच डाउनलोड लिंक्सही शेअर केल्या जात आहेत. एका युजरने पोस्ट शेअर केली आणि दावा केला की त्याच्याकडे 480P, 720p व1080p क्वालिटीमध्ये या सीरिजच्या फ्री लिंक्स आहेत, जिथून ही सीरिज चांगल्या क्वालिटीमध्ये मोफत डाउनलोड करून पाहता येते. पायरसी साइट तमिळ रॉकर्सवरही उपलब्ध आहे. ही पोस्ट व्हायरल होताच त्यावर कमेंट्सचा पूर आला आणि लोकांनी लिंक्स मागायला सुरुवात केली. एक्सवर अशा अनेक पोस्ट आहेत, ज्यामध्ये सीरिज ऑनलाइन लीक झाल्याचा दावा केला जात आहे.

चित्रपट आणि सीरिजच्या पायरसीचा मुद्दा नवीन नाही. अनेक बहुचर्चित चित्रपट व सीरिज रिलीज होतात तेव्हा त्या लीक झाल्याच्या बातम्याही येत असतात. चित्रपट किंवा सीरिज लीक झाल्यास त्याचा मोठा फटका निर्मात्यांना बसतो. कारण प्रेक्षकांना त्या सीरिज व चित्रपट मोफत घरबसल्या पाहता येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पंचायत 4’ बद्दल लोकांच्या प्रतिक्रिया

‘पंचायत 4’ पाहून चाहते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. काहींना ही सीरिज फार आवडली आहे, तर काहींनी सीरिजचा चौथा सीझन आधीच्या तीन सीझनइतका मजेदार नसल्याचं म्हटलं आहे. या सीझनमध्ये सचिव जी व रिंकी यांची लव्ह स्टोरी पुढे सरकताना पाहायला मिळते. नीना गुप्ता, जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सुनीता राजभर, सान्विका, दुर्गेश कुमार व अशोक पाठक हे कलाकार आहेत.