Mirzapur Season 3 Trailer: गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक कालीन भैय्या व गुड्डू पंडितची वाट पाहत आहे. पण आता लवकरच बहुचर्चित व बहुप्रतीक्षित अशी ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिज भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी सीरिजचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरला बाबू जीचा (कुलभूषण खरबंदा) आवाज दिला होता. “घायल शेर लौट आया है,” असं या टीझरमधून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता ‘मिर्झापूर ३’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच स्विटी आणि मुन्ना भैय्याचा खून करतानाचा सीन दाखवला असून मागे एका नेत्याचा आवाज ऐकू येत आहे. हा नेता आपल्या भाषणाची तयारी करताना दिसत आहे. तो म्हणतो, “निष्पाप जीव गेल्यामुळे व मालमत्तेच्या नुकसानामुळे आमचं हृदय करोनाने भरून आलं आहे.” त्यानंतर गुड्डू पंडितची दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. हातात मोठा हातोडा घेऊन गुड्डू चौकात असलेल्या कालीन भैय्याचा पुतळा पाडताना पाहायला मिळत आहे. “कालीन भैय्या गॉन, गुड्डू पंडित ऑन…”, असं म्हणत गुड्डू कालीन भैय्याच्या पुतळ्यावर घाव घालतो. महत्त्वाचं म्हणजे कालीन भैय्याची बायको बीना त्रिपाठी आता गुड्डूला साथ देताना दिसणार आहे. तर गोलू गुप्ता मोठा प्लॅन करताना ट्रेलरमध्ये दिसत आहे. पण असं असलं तरी सगळेजण गुड्डू पंडितचं राज्य संपवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.

हेही वाचा – Video: “कसं काय?…” ‘बिग बॉस’ फेम आयशा खानला मराठी भाषेची पडली भुरळ, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”

गेल्या सीझनमध्ये गुड्डू पंडितने मोठा कांड केल्यानंतर त्याचे अनेक शत्रू झाले आहेत. त्यात कालीन भैय्या देखील आहे. त्यामुळे कालीन भैय्यासह सर्वजण गुड्डू पंडितला मारण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. म्हणूनच आता मिर्झापूरच्या खुर्चीवर गुड्डू पंडितचं राज्य राहणार की कालीन भैय्या नवा डाव खेळून गुड्डू पंडितला संपवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: “कोण म्हणेल का मराठी गायक आहे म्हणून”, रोहित राऊतने पहिल्यांदाच गायलेलं तमिळ गाणं ऐकून चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रोडक्शनची ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजचं दिग्दर्शन गुरमीत सिंह आणि आनंद अय्यर यांनी केलं आहे. या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय शर्मा, ईशा तलवार, अंजुम शर्मा, प्रियांशु पेन्यूली, हर्षिता शेखर गौर, राजेश तैलंग, शीबा चड्ढा, मेघना मलिका आणि मनु ऋषि चड्ढी असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. ५ जुलै २०२४ रोजी ‘मिर्झापूर ३’ सीरज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.