‘स्कॅम १९९२ – अ हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज चांगलीच गाजली. प्रतीक गांधीसारखा एक उत्तम अभिनेता या वेबसीरिजमुळे लोकांच्या नजरेत आला. एकूणच या वेबसीरिजचं प्रचंड कौतुक झालं. यानंतर या सीरिजचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी त्यांच्या याच सीरिजमधील पुढच्या गोष्टीची घोषणा केली. ‘स्कॅम २००३ – तेलगी स्टोरी’ या आगामी वेबसीरिजची हंसल यांनी घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधीच्या वेबसीरिजमुळे या नव्या गोष्टीची प्रत्येकाला उत्सुकता लागली होती. आता मात्र या नव्या वेबसीरिजच्या बाबतीत एक वेगळीच गोष्ट समोर येत आहे. तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर आधारीत या वेबसीरिजच्या निर्मात्यांविरुद्ध नुकतीच मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळेच आता ही वेबसीरिज प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : “बॉलिवूडमधील मंडळी निरागस…” रोहित शेट्टीने मांडली हिंदी चित्रपटसृष्टीची चांगली आणि वाईट बाजू

या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगी याची मुलगी सना इरफान तालिकोटी हिने ही याचिका दाखल केली असून या वेबसीरिजच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. शिवाय यासाठी तेलगी कुटुंबियांची परवानगी न घेतल्याचा आरोपही त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. सनाने या याचिकेत म्हंटल्याप्रमाणे ही वेबसीरिज एका पुस्तकावर आधारीत आहे आणि त्या पुस्तकात सत्य परिस्थितीविषयी माहिती नसल्याचा दावा सनाने केला आहे. शिवाय या कादंबरीमध्ये तेलगी यांची व्यक्तिरेखा खोटी, आपमानास्पद पद्धतीने मांडलेली आहे असंही तिचं म्हणणं आहे. यामुळे संपूर्ण तेलगी कुटुंबाची बदनामी होत आहे आणि घरातील अल्पवयीन मुलांचंही मोठं नुकसान होत असल्याचं सनाने या याचिकेत म्हंटलं आहे.

तेलगीने बँका, विमा कंपन्या आणि गुंतवणूक करणाऱ्या संस्था अशा कित्येकांना बनावट स्टँप पेपर विकले होते. तेलगीला २२ नोव्हेंबर २००१ रोजी बंगळुरूमधून अटक करण्यात आली होती. तेलगीच्या अटकेनंतर हजारो कोटी रुपयांचा हा स्टँप घोटाळा उघड झाला. आता न्यायालय या वेबसीरिजविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर काय सुनावणी करणार याकडे या सीरिजच्या मेकर्सचे आणि तेलगी कुटुंबाचे लक्ष आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petition filed against scam 2003 the telgi story a hansal mehta upcoming webseries avn
First published on: 22-12-2022 at 14:24 IST